धाराशिव (प्रतिनिधी)- हरित धाराशिव अभियानातुन 15 लक्ष वृक्ष लागवड हा ऐतिहासिक असा उपक्रम जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी यशस्वीपणे पार पाडण्याचा प्रयत्न केला,हे कार्य कौतुकास्पद व अभिनंदनीय आहे,देशातील एकमेव हा उपक्रम आदर्शवत असुन पर्यावरण आणि आरोग्य याचा संगम आहे.एक पेड मॉ के नाम या उपक्रमातील यशस्वी ठरलेले ब्रिद सार्थक ठरेल,या वृक्षांचे संवर्धन आणि संरक्षण हे देखील महत्त्वाचे आहेच,या अभियानात मतदार जनजागरण समिती धाराशिव,पर्यटन जनजागृती संस्था धाराशिव,फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समिती धाराशिवचे पदाधिकारी उपस्थित होते,देविदास पाठक,गणेश वाघमारे,संजय गजधने,बाबासाहेब गुळीग,प्रविण जगताप,इतर सहभागी होते,जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष यांना शुभेच्छा दिल्या या अभियानात राबणारे सर्व विविध विभागांतील अधिकारी,कर्मचारींनी परिश्रम घेतले त्यांचेही अभिनंदन आहे,या अभियानात सहभागी करुन घेणारे विस्तार अधिकारी भारत देवगुडे यांचेही अभिनंदन.शिंगोली परिसरासह धाराशिव जिल्ह्यातील या उपक्रमाची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड सह एशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली, ऐतिहासिक अशा उपक्रमातील हरित धाराशिव अभियान हे महाराष्ट्र राज्यातच नव्हे तर भारत देशात एक आदर्शवत ठरेल असे मनोगत गणेश वाघमारे यांनी यावेळी व्यक्त केले.