भूम (प्रतिनिधी)- सावता माळी हे कर्तव्य आणि कर्म करीत राहणे हीच खरी ईश्वार सेवा असे शिकवण देणारे संत आहेत. वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ आणि ज्येष्ठ संत म्हणून त्यांचा लौकिक आहे. श्री विठ्ठल हेच त्यांचे परमदैवत होते. ते कधीही पंढरपूरला गेले नाहीत. प्रत्यक्ष पांडुरंगच त्यांना भेटावयास आले. ते कर्ममार्गी संत होते. संत सावता माळी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त हभप रुपेश महाराज आळंदीकर किर्तन सेवेतून बोलत होते.

‌‘कर्मे ईशु भजावा' हीच त्यांची वृत्ती होती. पंढरपूरच्या विठ्ठलाची पालखी वर्षातून एकदा खास त्यांना भेटावयास येत असते. अध्यात्म आणि भक्ती, आत्मबोध आणि लोकसंग्रह, कर्तव्य आणि सदाचार याची बेमालूम सांगड त्यांनी घातली. भूम शहरातील कसबा विभागांमध्ये दरवर्षी संत सावतामाळी महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात येते. सकाळपासूनच पुण्यतिथीनिमित्त अभिषेक, पूजा, आरती, भजन, कीर्तन आधी कार्यक्रम होतात.

दुपारी बारा वाजता किर्तन झाल्यानंतर फुले उधळून पुण्यतिथी साजरी करण्यात आली. त्यानंतर महाप्रसाद होऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .यावेळी माजी नगराध्यक्षा संयोगिता गाढवे यांच्या हस्ते विठ्ठल रुक्माई ,व सावता महाराज यांची आरती करण्यात आली .यावेळी भजन कीर्तनासाठी सावता माळी भजनी मंडळ,महादेव मंदिर भजनी मंडळ, श्री हनुमान भजनी मंडळ उपस्थित होते. यावेळी सुनील माळी, अमोल माळी, सुहास माळी, निलेश माळी, सतीश माळी, आदेश माळी, राम माळी, वसंत माळी, धनंजय माळी, बाळासाहेब माळी, अनिल माळी, निलेश माळी आदी समाज बांधव व महिला उपस्थित होत्या.

 
Top