धाराशिव (प्रतिनिधी)-  मुंबई येथे महामंडळाचे राज्याध्यक्ष नरेंद्र बारई यांच्या सूचनेनुसार महामंडळाच्या राज्य सरचिटणीस  दिगंबर बेंडाळे यांच्या नेतृत्वात ग्रेड परीक्षांच्या फी वाढीबाबत महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ मुंबई,  मंडळाचे संचालक विनोद दांडगे यांच्याबरोबर शासकीय रेखाकला परीक्षा फी वाढीबाबत फेरविचार करण्याबाबत निवेदन देण्यात आले.

परीक्षा शुल्क तसेच अतिरिक्त विलंब शुल्क बाबतीत फेर विचार करून शुल्क कमी करण्यात यावी. गेल्या अनेक वर्षांपासून परीक्षेचा मेहनताना पूर्वीचे कला संचालनालयाचा परीक्षा विभाग यांच्याकडून देण्यात आलेला नाही तो त्वरित देण्यात यावा. तसेच यावर्षीचाही मेहनताना देण्यात यावा. विषयावर चर्चा करण्यात आली सॉफ्टवेअर चे काम पूर्ण झाले असून ऑनलाईन पद्धतीने लवकरच मेहनताना शाळेच्या खात्यांवर जमा केला जाईल. प्रमाणपत्र ऑफलाइनम्हणजेच छापून देण्यात यावे. प्रमाणपत्र छपाई चे काम पूर्णत्वास आले असून 15 ऑगस्ट पर्यंत प्रमाणपत्र देण्यात येतील यावर चर्चा करण्यात आली प्रमाणपत्र केंद्र प्रमुखांकडे देण्यात यावीत. पोस्टाने पाठवण्यात येऊ नये पोस्टाने पाठवण्यात येऊ नये असे महामंडळाचे राज्यसचिव बेंडाळे सरयांनी सुचवले. परीक्षेचे नियोजन करण्यापूर्वी संघटनांच्या प्रतिनिधींची एक बैठक घेण्यात यावी. बैठक घेण्यात येणार असे आश्वासन दिले.

निकालाची फेर तपासणी व नावातील चुकांची दुरुस्ती लवकरात लवकर करण्यात यावी. फेर तपासणी करून व दुरुस्ती करून प्रमाणात लवकरात लवकर देण्यात येतील. वरील सर्व मुद्द्यांवर चर्चा सकारात्मक करण्यात झाली. यावेळी विभागीय उपाध्यक्ष  विलास सेसाने मुंबई कलाध्यापक संघटनेचे अध्यक्षा श्रीमती मीरा चाफेकरखजिनदार  अविनाश मोकाशे उत्तर विभागाचे उपाध्यक्ष नंदकुमार पवार  खजिनदार निशिकांत कांबळे दत्तात्रय उंडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळाचे परीक्षे संदर्भातील अडचणी सोडवण्याचे काम सदैव सुरू राहणार आहे.

 
Top