तुळजापूर (प्रतिनिधी)- धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी आज सकाळी सहकुटुंब श्री क्षेत्र तुळजापूर येथे येऊन श्री तुळजाभवानी देवीची अभिषेक पूजा करून देवीच्या चरणी नतमस्तक होत कुलधर्म व कुलाचारानुसार पूजा-अर्चा केली. यानंतर त्यांनी देवीची ओटी भरून आरती केली. या धार्मिक विधींमध्ये सरनाईक कुटुंबातील सदस्य सहभागी झाले होते.
पालकमंत्री सरनाईक हे दोन दिवसांच्या धाराशिव जिल्हा दौऱ्यावर आहेत. दर्शनानंतर त्यांनी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या प्रशासकीय कार्यालयात पोलीस अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली.
पालकमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक शफकत आमना, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख, तहसीलदार तथा मंदिर संस्थानचे व्यवस्थापक (प्रशासन) अरविंद बोळंगे, पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे माजी आ ज्ञानराज चौघुले भगवान देवकते जिल्हाप्रमुख मोहन पेनुरे तालुकाप्रमुख अमोल जाधव शहरप्रमुख बापुसाहेब भोसले उपशहरप्रमुख काकासाहेब चिवचिवे तसेचय मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.