धाराशीव (प्रतिनिधी)-  शेतकऱ्यांना आर्थिक विवंचनेतुन बाहेर पडण्याचा मोठा पर्याय म्हणजे पिक कर्ज परंतु .पिक कर्ज देण्यासाठी  राष्ट्रीयीकृत बँका नेहमी अडवणुक  किंवा  टाळण्याचा प्रयत्न करतात. परंतु ज्या शेतकऱ्याच्या  पिक कर्ज प्रस्तावात कोणतीही त्रुटी नसताना बँक पिक कर्जे देत नसेल तर अशा शेतकऱ्याना कर्ज मिळवून देण्यासाठी मदत करणार असल्याचे भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रामरास कोळगे यांनी म्हटले आहे. 

कोळगे यांनी या संदर्भात म्हटले पुढे म्हटले आहे की, कमी कागदपत्र व अल्प व्याजदर, विना जामीनदार मिळणारे कर्ज म्हणजे पिक कर्ज या कर्जासाठी शेतकरी वर्ग अगोदर प्राधान्य देतो. परंतु अनेक बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी हात अखडता घेतात व प्रत्येकाला वेगवेगळी कारणे सांगून कर्ज देण्याचे टाळतात. शेतकऱ्यांना कर्ज न मिळाल्यामुळे शेतीची प्रगती करणे, खते बियाणे, औजारे खरेदी करणे किंवा इतर खर्चासाठी अनेक अडचणीला सामोरे जावे लागते. जर बँकांनी शेतकऱ्यांना अडवणूक न करता कर्ज दिले. तर त्यांच्या गरजेला मदत होते. त्यांच्या शेतीला हातभार लागतो पण अनेक बँका शासनाने ठरवुन दिलेले उद्दिष्टही गाठत नाहीत त्यामुळे कोणता ही शेतकरी कर्जापासून वंचित राहू नये. यासाठी  भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा  कर्ज मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी रितसर बँकेच्या अटी नियमावली मध्ये आपापल्या दत्तक बँकेमध्ये कर्ज प्रकरण करावे त्यानंतरही बँकेकडून टाळाटाळ होत असेल तर  अशा कर्ज प्रकरणासाठी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येतील. 

 
Top