धाराशिव (प्रतिनिधी)- अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद मराठवाडा विभाग (धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली) अध्यक्षपदी मा. श्री. आबासाहेब खोत यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री मा. छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आली. या नियुक्तीबद्दल माजी खासदार मा. समीर भुजबळ व आमदार मा. पंकज भुजबळ यांनी आबासाहेब खोत यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
या निवडीमुळे समता परिषदेच्या कार्यात नवचैतन्य निर्माण होईल व सामाजिक न्याय, समता आणि बंधुता यांसारख्या मूल्यांची प्रभावी अंमलबजावणी मराठवाडा विभागात होईल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.
माजी खासदार समीर भुजबळ यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले की, "आबासाहेब खोत हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रीय असून, समता परिषदेच्या माध्यमातून त्यांनी तळागाळातील लोकांसाठी भरीव कार्य केले आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे परिषद मराठवाड्यात अधिक प्रभावी होईल, याची खात्री वाटते."
धाराशिव, लातूर, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांचा समावेश असलेल्या विभागासाठी ही निवड अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून, अनेकांनी अभिनंदनपर शुभेच्छा दिल्या आहेत. आबासाहेब खोत यांनी आपल्या नियुक्तीबद्दल भुजबळ परिवाराचे तसेच परिषदेसह सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत. यावेळी दिलीप खैरे,सुभाष राऊत,व्यंकट जाधव,नागेश गवळी,बापूसाहेब भुजबळ उपस्थित होते.