धाराशिव (प्रतिनिधी)-  धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष डॉ. स्मिता शहापूरकर यांच्यावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने पक्षाची मोठी जबाबदारी सोपवली आहे. पक्षश्रेष्ठींनी त्यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी मंगळवारी निवड केली आहे. 

काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेनूगोपाल यांनी मंगळवार दि. 29 जुलै रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर केल्या. त्यानुसार धाराशिव येथील जिल्हा उपाध्यक्ष डॉ. स्मिता शहापूरकर यांची प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी निवड करण्यात आली आहे. 

डॉ. स्मिता शहापूरकर या मागील तीन दशकांपासून विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून सामाजिक कार्य करतात. मराठवाड्या मध्ये त्यांनी विविध सामाजिक विषयांवर काम केल्याचा दांडगा अनुभव आहे.इंडियन मेडिकल असोसिएशनच्या धाराशिव अध्यक्ष म्हणून काम केले आहे. मागील 15 वर्षांपासून त्या काँग्रेसमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी यापूर्वी महिला प्रदेश उपाध्यक्ष म्हणून 11 वर्ष काम केले आहे. जिल्हा उपाध्यक्ष या पदावर 2 वर्षा पासून कार्यरत आहेत. 

 
Top