तुळजापूर (प्रतिनिधी)- शहरात सामाजिक संस्था, विविध संस्था,पक्ष संघटना,युवकांनी या वृक्षा रोपण अभियाना मध्ये आपला सहभाग उत्सपूर्तपणे नोंदवला.
तुळजापूर हरित धाराशिव अभियान संकल्प वृक्षरोपणाचा एका दिवसात 12 हजार वृक्ष झाडे लावण्यात आली.
यावेळेस महंत इच्छागिरी महाराज, योगी महंत मावजीनाथ महाराज, आमदार राणाजगजीतसिंह पाटील, युवा नेते विनोद गंगणे, माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, मुख्याधिकारी रणदिवे, आनंद कंदले, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच शहरातील विविध पक्ष संघटना,टाटा सामाजिक संस्था,तुळजा भवानी मंदीरादतील अधिकारी,कर्मचारी तसेच सिक्युरिटी कंपनीचे सर्व कर्मचारी,नगर परिषद अधिकारी, कर्मचारी, न प शाळेचे सर्व शिक्षक कर्मचारी,बचत गटाच्या महीला आदी शहरातील युवकांचा सहभाग होता.