उमरगा (प्रतिनिधी)- येत्या काही दिवसात राज्यात स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका होणार असुन ही निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक असणार आहे. शिवसैनिकांनी गाफील न राहता आगामी निवडणुकांसाठी सज्ज रहावे असे आवाहन शिवसेना समन्वयक तथा माजी आमदार डॉ.राजन साळवी यांनी केले आहे. राजापुर लांजा साखरपा मतदारसंघाचे माजी आमदार डॉ.राजन साळवी यांची शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांनी लातूर व धाराशिव जिल्हा शिवसेना समन्वयक म्हणुन निवड केली असुन सध्या ते लातूर व धाराशिव जिल्हयाच्या दौऱ्यावर आहेत. या अनुषंगाने सोमवार दि.28 रोजी उमरगा शहरातील श्री.मंगल कार्यालय येथे पार पडलेल्या उमरगा-लोहारा तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांच्या बैठकीत ते बोलत होते.  

उमरगा विधानसभा मतदारसंघासह सबंध धाराशिव जिल्हा हा पुर्वीपासुन शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणुन ओळखला जातो. मागील निवडणुकीत आपण गाफील राहिल्याने काठावर पराभव पत्करावा लागला आहे. पदाधिकारी व शिवसैनिकांनी गावोगावी शिवसेनेच्या शाखा पुनर्जिवीत कराव्यात. निवडणुकीतील बारकावे समजुन घेऊन सुक्ष्म नियोजन करावे. रिक्त असलेल्या ठिकाणी नव्याने पदाधिकारी नेमुन संघटन वाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे पुढे बोलताना त्यांनी सांगितले.  तसेच माजी खासदार प्रा.रविंद्र गायकवाड, शिवसेना उपनेते तथा माजी आमदार ज्ञानराज चौगुले, युवा सेना विभागीय निरीक्षक किरण गायकवाड, यांनीही उपस्थित शिवसैनिकांना सविस्तरपणे मार्गदर्शन केले. सहसंपर्कप्रमुख भगवान देवकाते, युवती सेना निरीक्षक ॲड.आकांक्षा चौगुले, जिल्हाप्रमुख मोहन पणुरे यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती. 

या कार्यक्रमात भगवान देवकाते यांची धाराशिव जिल्हा सहसंपर्कप्रमुख पदी  व डॉ.फरीद अत्तार यांची शिवसेना डॉक्टर सेलच्या मराठवाडा विस्तारक तथा उमरगा तालुकाप्रमुख पदावर निवड झाल्याबददल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. 

बैठकीस तालुकाप्रमुख बळीराम सुरवसे, जगन्नाथ पाटील, शहरप्रमुख योगेश तपसाळे युवा सेना जिल्हाप्रमुख सचिन जाधव, तालुकाप्रमुख विनोद कोराळे, बलभीम येवते, विलास भगत, अमर शिंदे, सुभाष येळीकर, तुकाराम उपासे, प्रताप लोभे, दिपक रोडगे, अभिमान खराडे, सुरेश मंगरूळळे, नरेंद्र माने, चंद्रशेखर मुदकण्णा, घनश्याम चिंचोळे, सौ.सारिकाताई कांबळे, सौ.संध्याताई शिंदे, सौ.लताताई भोसले, संदीप चौगुले, पप्पु समन, विजय माने, विजय भोसले, अमोल पाटील, नामदेव लोभे, बसवराज शिंदे, अरूण जगताप, विजय भोसले, धोंडीराम पवार, शरद पवार, संतोष सगर, हरिदास भोसले, बालाजी बनसोडे, भरत कलबुर्गे, ज्ञानेश्वर पाटील, शिवराज चिनगुंडे, अमोल सोमवंशी, संजय रणखांब, काशिनाथ पाटील, नामदेव पवार, बालाजी जाधव, सुरेश दंडगुले, आदी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मनोज जाधव व आभार प्रदर्शन चंद्रशेखर सुर्यवंशी यांनी केले.

 
Top