परंडा (प्रतिनिधी)- शहरातील मुख्य रस्त्यावरिल बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत चोरट्यांनी धाडसी चोरी करण्याला प्रयत्न केला.गॅस कटरच्या साह्याने कॅश असेलेली तिजोरी फोडण्याचा प्रयत्न झाला. मात्र तिजोरी गॅसक्टरने न फुटल्याने बँकेतील तिजोरीत असलेले अंदाजे 25 लाख रुपये चोरी करण्याचा डाव फसला.      

शहरातील मुख्य व्यापार पेठ रोडवर व पोलीस ठाण्याच्या जवळच असलेली बँक ऑफ महाराष्ट्र पुरस्कृत महाराष्ट्र ग्रामीण बँकेची परंडा शाखा आहे. शुक्रवार दि.25 रोजी सायंकाळी बँकेचे कर्मचारी यांनी शिल्लक असलेली रक्कम कॅशरूम मधील लोखंडी तिजोरीत ठेवून शटरला कुलूप लावून गेले होते. बँकेला शनिवार व रविवार रोजी सुट्टी असल्याने सोमवारी दि. 28 जुलै रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास शाखेचे कर्मचारी बँकेत आले असता त्यावेळी त्यांना बँकेच्या पाठीमागील भिंतीच्या खिडकीचे लोखंडी गज व ग्रिल गॅस कटरच्या साह्याने तोडलेली प्रथम दर्शनी दिसून आले. तसेच संगणकाच्या वायरी तोडलेले दिसले. त्यामुळे बँकेत चोरीचा प्रयत्न झाल्याचा त्यांच्या निर्देशनात आले. महाराष्ट्र बँकेचे मॅनेजर यांनी झालेल्या प्रकराची माहिती परंडा पोलीसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटना स्थळी भेट देवून पाहणी केली असता कॅशरूमच्या शटरचे चॅनल तोडून त्यात लावलेले कुलूप तोडल्याचे दिसून आले. घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती घेऊन पोलीसांनी परंडा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.


 
Top