तुळजापूर (प्रतिनिधी)-  स्ञीशक्ती देवता नगरीतील सावित्रीच्या लेकी मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला झाला आहे. या जिल्हयाच्या पोलिस अधीक्षकपदी महिला असताना मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनल्याने या सारखे सावित्रीच्या लेकीचे दुसरे कोणते दुर्दैव असावे सवाल पालकांमधुन केला जात आहे.

शहरातील कॉलेज बसस्थानक आणि कॉलेज मार्गावर टवाळखोरांकडून मुलींना छेडछाड प्रकार  घडत आहेत. नुकत्याच घडलेल्या घटनेत एका अल्पवयीन मुलीने छेडछाड आणि धमकीला कंटाळून आत्महत्या केली होती. या प्रकरणाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले होते. ही घटना ताजी असताना शनिवार दि. 12 जुलै रोजी दुपारी नवीन बसस्थानक परिसरात एका मुलीची छेडछाड प्रकार घडला. या प्रकरणाचे पुढे काय झाले, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. घटनास्थळी आणि संबंधित परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून कारवाईची मागणी होत आहे.

या घटनांमुळे मुलींच्या पालकांमध्ये भीतीचे आणि असुरक्षेचे वातावरण आहे. पीडित मुलगी गरीब कुटुंबातील असल्याने तिला न्याय मिळेल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पोलिसांनी काही प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल केले असले तरी, अशा घटना थांबत नसल्याने टवाळखोरांची हिंमत वाढण्याची भीती पालकांकडून व्यक्त केली जात आहे. संपूर्ण परिस्थिती पाहता, तुळजापूरसारख्या धार्मिक, देवीच्या नगरीतही मुली सुरक्षित नाहीत आणि प्रशासनाकडून तातडीने कडक पावले उचलण्याची गरज आहे.

 
Top