धाराशिव (प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) धाराशिव जिल्हा कार्यकारिणीची निवड जाहीर करण्यात आली आहे. तालुक्यातील धारूर येथील भैरवनाथ हायस्कूलमध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे अध्यक्ष आमदार ज. मो. अभ्यंकर यांच्या प्रमुख उपस्थितीत धाराशिव जिल्हा शिक्षक सेनेची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार व धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार कैलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडी जाहीर करण्यात आल्या.
जिल्हा कार्यकारिणीत शिक्षक सेना महिला आघाडी जिल्हाध्यक्षपदी तनुजा दुलंगे, जिल्हा उपाध्यक्ष मोतीराम राठोड, धाराशिव तालुकाध्यक्ष किरण शानमे, तालुका सचिव सचिनकुमार सोनकटाळे, तालुका सहसचिव नितीन चौधरी, तुळजापूर तालुकाध्यक्षपदी सत्यवान गायकवाड, लोहारा तालुकाध्यक्ष राजेंद्र गावडे, तालुका उपाध्यक्ष संतोष कांबळे तर वाशी तालुकाध्यक्षपदी शशिकांत सरवदे यांची निवड घोषित करण्यात आली. निवडीनंतर सर्व पदाधिकाऱ्यांचा नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी राज्य सरचिटणीस रमेश चौगुले, राज्य उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण, दत्ता पवार, उर्दू विभाग अध्यक्ष मुश्ताक पटेल, मराठवाडा विभाग अध्यक्ष नामदेव सोनवणे, मराठवाडा विभाग कार्याध्यक्ष बाळासाहेब राखे, धाराशिव जिल्हा शिवसेना समन्वयक तथा शिक्षक सेनेचे धाराशिव जिल्हा संपर्कप्रमुख दिनेश दत्ता बंडगर, धाराशिव जिल्हाध्यक्ष विजयकुमार कुलकर्णी, बाळासाहेब मुळे, जिल्हा उपाध्यक्ष विभुते, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षक सेना पदाधिकारी उपस्थित होते.