तुळजापूर (प्रतिनिधी)- पुणे स्थित श्री तुळजाभवानी देवींचे भाविक शिवाजी आखाडे यांनी त्यांचे बंधू तसेच व्याह्यांच्या वाढदिवसानिमित्त श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानला एकूण 1 लाख 25 हजार रुपयांचे मिडिया साहित्य भेट दिले. या साहित्यात ट्रायपॉड स्टँड, कॉलर माईक, मोबाईल फोन, जिम्बल, फ्लॅशलाईट, कॅमेरा फिल्टर, ड्राय कॅबिनेट इत्यादी साहित्याचा समावेश आहे. 

ऑटोलाईन कंपनीकडून कॉम्प्युटर वर्कस्टेशन  कंपनीचे 1 लाख 67 हजार किमतीचे कॉम्प्युटर वर्कस्टेशन भेट दिले. यामध्ये अद्ययावत कॉम्प्युटर सह प्रिंटर व यूपीएस चा समावेश आहे. मंदिर संस्थान चे विश्वस्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश अहिरराव, तहसीलदार तथा व्यवस्थापक अरविंद बोळंगे यांच्याहस्ते या साहित्याचे लोकार्पण केले. यावेळी नागेश शितोळे, अमोल भोसले, रामेश्वर वाले, नितीन साके, प्रशांत जाधव, आकाश गायकवाड, गणेश नाईकवाडी आदी उपस्थित होते.

 
Top