धाराशिव (प्रतिनिधी)- श्रीपतराव भोसले हायस्कूलमधील इयत्ता आठवी (क ) मध्ये शिकणारा विदयार्थी कु. मयुरेश महेश स्वामी याने आ. जगन्नाथ शिंदे बुद्धिबळ चषक स्पर्धा सोलापूर येथे पार पडलेल्या 14 गटात 6 पैकी 6 मॅचेस जिंकून प्रथम क्रमांक पटकावल्या बद्दल नाईक यांच्या हस्ते ट्राफी (चषक) सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र तसेच रोख रक्कम देवून त्याचा सत्कारीत करण्यात आले .
या यशाबद्दल आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील , सरचिटणीस प्रेमाताई पाटील , मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य पाटील , प्राचार्य एन .आर . नन्नवरे , उपप्राचार्य संतोष घार्गे , उपमुख्याध्यापक प्रमोद कदम व आठवीचे पर्यवेक्षक सुनील कोरडे , क्रीडा शिक्षक राजाभाऊ पवार , वर्गशिक्षक अरविंद आत्माराम जाधव यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.