तुळजापूर (प्रतिनिधी)- शिवसेनेच्या तुळजापूर तालुका आढावा बैठकीने तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापवले असून, या बैठकीस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह दिसून आला. शिवसेना समन्वयक व ज्येष्ठ नेते राजन साळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली.
या बैठकीत ज्ञानराज चौगुले (उपनेते), भगवान देवकते (जिल्हा सहसंपर्कप्रमुख), मोहन पनुरे (जिल्हाप्रमुख), गणेश जगताप (युवा सेना जिल्हाध्यक्ष) यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संघटनात्मक कामकाजाचा सविस्तर आढावा, पक्षवाढ व नविन कार्यकर्त्यांचा सहभाग, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणनिती बैठकीदरम्यान राजन साळवी यांच्या नेतृत्वाखाली अनेक युवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. स्वागत म्हणून पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. ग्रामीण भागातील युवकांचा पक्षात ओढा वाढत असल्याचे यावरून स्पष्ट झाले.
राजकीय चर्चांना पूर्णविराम देत, “महायुतीसोबत युती न झाल्यास शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवेल“ असा ठाम संदेश बैठकीतून देण्यात आला. “स्वयं बाळाचा नारा“ देत कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आवाहन करण्यात आले.
प्रमुख पदाधिकारी उपस्थित: तालुका अध्यक्ष अमोल जाधव, शहर प्रमुख बापू भोसले, उपशहर प्रमुख रमेश चिवचिवे, शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख गणेश नेपते, महिला पदाधिकारी मीनाताई सोमाजी, राधा घोगरे, रेणुका शिंदे, लता हरवळे, तसेच सौरभ भोसले, नितीन मस्के, संजय लोंढे आदींची उपस्थिती लक्षणीय ठरली.
ही आढावा बैठक केवळ कार्यक्रमापुरती न राहता, शिवसेनेच्या आगामी राजकीय रणनितीची दिशा स्पष्ट करणारी ठरली. संघटनात्मक बळकटीसह नवचैतन्य निर्माण करत शिवसेना तालुका स्तरावर संपूर्ण ताकदीने निवडणुकीसाठी सज्ज झाली आहे.