भूम (प्रतिनिधी)- भूम शहरातील खामकर गल्लीमध्ये असलेल्या मनीषा खामकर यांच्या राहत्या इमारतीच्या वरच्या गॅलरीमध्ये 26 जुलै रोजी रात्री 11 वाजता तब्बल आठ ब्रम्हकमळ उमलले आहेत. हे ब्रह्मकमळ येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत होते.
घराच्या सभोवताली ब्रह्म कमळाचे रोप शुभ समजले जाते. घरात सकारात्मक शुभेच्छा आणि ऊर्जा आणते. फुलाचा मादक अन् उग्र सुगंध असतो. ब्रह्मकमल हे एक निशाचर फुलांचे रोप आहे. ज्याला फुलण्यासाठी चंद्रप्रकाशाची आवश्यकता असते. म्हणूनच ते फक्त रात्रीच फुलते. पूर्ण बहर येण्यासाठी देखील सुमारे 2 तास लागतात.
अशाच प्रकारे भूम शहरातील खामकर गल्लीमध्ये राहणाऱ्या खामकर वाड्यापैकी अगदी रस्त्या लगत असलेल्या मनीषा शंकर खामकर यांच्या इमारतीच्या वरच्या गॅलरीमध्ये परसबाग केली आहे. या परस बागेमध्ये वेल लावलेले आहेत. ते चांगल्या पद्धतीने वाढले आहेत. याशिवाय सदाफुलीची रोपे आलेली आहे. त्यालाही फुले येतात. कुंडीमध्ये दैनंदिन आहारासाठी लागणारा पुदिना मोठ्या प्रमाणात आलेला दिसतो आहे. दैनंदिन गवती चहा वापरून आरोग्यासाठी चांगला असलेला गवती चहा देखील कुंडीमध्ये लावलेला आहे. तो देखील या ठिकाणी चांगल्या पद्धतीने वाढलेला दिसत आहे. तसेच दुसऱ्या भागात आळूची पाने, मिरचीची रोपे, पपईचे झाड देखील लावलेले आहे. विशेष म्हणजे मोगरा या फुलाचा वेल देखील मोठया प्रमाणात वाढलेला दिसत आहे.
गेल्या अनेक वर्षापासून या छोट्या-छोट्या रोपांची चांगल्या पद्धतीने निगा राखून काही गोष्टींचा आहारामध्ये वापर केला जातो. या सर्व फुलांचा चांगला सुगंध देखील दरवळतो आहे. येणाऱ्या जाणाऱ्यांचं लक्ष वेधून घेतो. गेल्या तीन वर्षापूर्वी कुंडीमध्ये एक ब्रम्हकमळाचे रोप लावले होते. त्या रोपाला गेल्या तीन वर्षापासून ब्रम्ह कमळ उमलतात. यावर्षी देखिल त्या रोपाला शनिवार दिनांक 26 जुलै 2025 रोजी संध्याकाळी 11 वाजता एक नव्हे तब्बल आठ ब्रह्मकमळ उमलले आहेत. हे ब्रह्मकमळ येणाऱ्या जाणाऱ्यांच चांगलेच लक्ष वेधून घेत होते.