भूम (प्रतिनिधी)- बऱ्हाणपूर जि प शाळा परिसरात युवासेना व हरित धाराशिव अभियानांतर्गत युवासेनेचे पांडुरंग धस यांच्या वतीने 100 वृक्ष लागवड करण्यात आली.

परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक, माजी मंत्री तथा आमदार तानाजी सावंत,खासदार श्रीकांत शिंदे,शिवसेना सहसंपर्कप्रमुख भगवान देवकते यांच्या मार्गदर्शनाखाली व युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, युवासेना सचिव राहुल लोंढे, युवा सेना मराठवाडा निरीक्षक आकांक्षा चौगुले, किरण गायकवाड,समन्वयक नितीन लांडगे, युवासेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब मांगले, सूचनेनुसार  युवासेनेच्या वतीने शासकीय दवाखाने, महाविद्यालय, जि प शाळा, हायस्कूल शासकीय कार्यालय या ठिकाणी 10000 झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

जि प शाळा परिसरात वृक्ष लागवड करताना युवासेना बालाजी वारे,गणेश शेलार, अजित पाटील, अजित करडे,अभिषेक घाडगे, आदित्य घाडगे, विशाल पाटील, मुख्याध्यापक शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. झाडे ही नैसर्गिक संपत्ती असून ती पृथ्वीवरील प्रत्येक सजीवाला जगण्याची ऊर्जा देतात. म्हणून वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे.झाडे जीवन बदलू शकतात म्हणून प्रत्येक माणसाने झाडांची नाळ जोडली पाहिजे. असे मत युवासेनेचे पांडुरंग धस यांनी व्यक्त केली.

 
Top