तुळजापूर - श्रावण महिन्यानिमित्त श्रीक्षेत्र तुळजापूर येथील महाद्वार जवळील खडकाळ गल्ली येथे गुरुवार दि31जुलैते गुरुवार दि7आँगस्टया कालावधीत “अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, शिवलीला अमृत पारायण व श्रीमद् देवी भागवत कथा“ सप्ताह आयोजन केले आहे, यंदाचे हे 11वे वर्ष आहे.
या सोहळ्यास साठी व्यासपीठ अधिकारी म्हणून हभप उज्वलाताई अजितमामा क्षिरसागर असुन कथा प्रवक्ते हभप हनुमंत महाराज पाटील हे आहेत. कार्यक्रमात दररोज 4 ते 6 काकडा आरती, सकाळी 7.30 ते 11.30 ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी 12 ते 1 गाथाभजन, दुपारी 2 ते 5 शिवमहापुरान शिवलीला पारायण तर सायंकाळी 5 ते 6 हरिपाठ व प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या सप्ताहात खालील कीर्तनकारांचे किर्तन होणार आहेत. गुरुवार, 31 जुलै 2025 ह.भ.प. नामदेव महाराज फगाळ, परभणी, शुक्रवार, 1 ऑगस्ट 2025 ह.भ.प. भरत महाराज जोगी, परळी, शनिवार, 2 ऑगस्ट 2025 ह.भ.प. चेतनगिरी महाराज गावडे, उस्मानाबाद, रविवार, 3 ऑगस्ट 2025 ह.भ.प. कबीर महाराज अत्तार, सातारा, सोमवार, 4 ऑगस्ट 2025 ह.भ.प. पंकज महाराज थोरं, पाथरी, मंगळवार, 5 ऑगस्ट 2025 ह.भ.प. अच्युत महाराज, दस्तापूरकर, बुधवार, 6 ऑगस्ट 2025 ह.भ.प. अनिल महाराज पाटील, आळंदी. या धार्मिक सप्ताहाची सांगता गुरुवार, 7 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 ते12 काला किर्तन हभप धर्मराज दादा महाराज सामनागावकर यांच्या किर्तनानंतर सुनिल रोचकरी वतीने महाप्रसाद वाटप होणार आहे. तरी याचा लाभ आवाहन रणसम्राट कब्बडी संघ यांनी केले आहे.