कळंब (प्रतिनिधी)- धाराशिव-बीड-छ संभाजी नगर नवीन रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण सुरू झाले असून सदरील काम मध्य रेल्वे ने हैदराबाद येथील आर.व्ही. इंजिनीरिंग कन्सलटंशी कंपनी ला दिले आहे. कंपनी तर्फे दि 18,19 व 20 जुलै 2025 रोजी केज तालुक्यातील केज ते मांजरा नदी काठ आणि कळंब तालुक्यातील मांजरा नदी काठ ते कळंब रोड, येडशी असे दोन टप्प्यात हवाई ( ड्रोन व हेलीकॉप्टर) आणि जमीनी सर्वेक्षण केले आहे. 

कळंब-केज पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सदरील रेल्वे लाईन कळंब व केज जवळून जाण्याची दाट शक्यता असून त्याप्रमाणेच सर्वेक्षण चालू असल्याचे समजते. या साठी बीड चे खासदार बजरंग  सोनवणे आणि धाराशिव चे खासदार ओमराजे निंबाळकर दोघेही आग्रही आहेत हे विषेश. खासदार बजरंग सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्या मते ही सदरील रेल्वे मार्ग कळंब-केज जवळूनच जाणार असल्याचे सांगितले व त्यादृष्टीनेच सर्वेक्षण चालू आहे असे ते म्हणाले. 

या संदर्भात केज तालुक्यातील मांगवडगाव, लाखा, हादगांव, सारूकवाडी, चिंचोली आणि कळंब तालुक्यातील हसेगाव केज, बोर्डा, खेर्डा, मोहा आदी गावावरून हेलिकॉप्टर गेले दोन तीन दिवस सतत घिरट्या घालीत असलेल्या चे ग्रामस्थांनी सांगितले. 

या कामास गती यावी म्हणून रेल्वे कृती समिती तर्फे सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. त्याअंतर्गत रेल्वेच्या सोलापूर, पूणे व मुंबई कार्यलयांशी संपर्क साधला जात असून वेळोवेळी कागदपत्रे पुरवली जात आहेत असे समिती चे अध्यक्ष डॉ . रामकृष्ण लोंढे, सचिव ॲड . मनोज चोंदे, सह सचिव डॉ. अमीत पाटील  यांनी म्हटले आहे. 

            

पुणे हरंगुळ पुणे गाडीला ढोकी ला थांबा पाहिजे.धाराशिव जिल्ह्यातील जनतेला कुर्डूवाडी ते केम  19 किलोमीटरवर गाडी थांबते. केम वरून जेऊर 16 किलोमीटर आणि केम ते पारेवाडी 25 किलोमीटर ला थांबते आणि धाराशिव ते हरंगुळ 78 किलोमीटर दरम्यान एक ही थांबा नाही. पुणे हरंगुळ गाडी साठी ढोकीला थांबा देणे अत्यंत गरजेचे आहे. कारण जवळच तेर हे देवस्थान ढोकी मोठे गाव कारखाना आणि जवळपास लहान-मोठे खेडी यांचा नेहमी पुण्याची संपर्क येतो. बहुतांशी तरुण पुण्यातच गावाला असतात. त्यांना पुण्याला जाणे येणे सोयीचे होण्यासाठी सदर गाडी 40 किलोमीटर हरंगुळ वून व 40 किलोमीटर धाराशिव वरून मध्यभागी अंतरावर जेथे अत्यंत चांगली रोड कनेक्टिव्हिटी आहे. मुख्य रस्त्यावर असून वस्ती जवळ आहे. यामुळे एरिया पर्यटन स्थळास कारखाना ढोकी, कळंब, तडवळा, मुरुड परिसरातील खेड्यातील जनतेला तरुणांना पुण्याला जाणे येणे सोयीचे होईल. सर्व लोकप्रतिनिधींनी सह ढोकीला थांबा मिळू शकेल सामूहिक प्रयत्नाची गरज आहे. 

प्रवाशी मित्र संघटना प्रा. मोहन जाधव कळंब.


 
Top