तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ तुळजापूर येथील बहुचर्चित नाव असलेले सेवन गटातील विनोद गंगणे यांना अखेर उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजी नगर खंडपीठाने अखेर जामीन मंजूर झाली आहे. आगामी नगर परीषद निवडणुक पार्श्वभूमीवर विनोद गंगणे यांना मिळालेला जामीन त्यांच्या राजकिय कारकिर्द साठी महत्वाची ठरणार आहे.
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात यापुर्वी विनोद गंगणे यांना सेवन गटातुन अंतरीम जामीन मिळाला होता. नंतर तो रद्द झाला होता. त्यानंतर त्यांनी छत्रपती संभाजी नगर खंडपीठात जामीनसाठी धाव घेतली. अखेर त्यांना जामीन मंजूर झाली. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात यापुर्वी प्रा. अलोक शिंदे नंतर उदय शेटे यांना जामीन मंजुर झाला होता. आता विनोद गंगणे रुपाने हा तिसरा जामीन मंजूर झाला आहे. आतापर्यंत या प्रकरणात एकूण 38 संशयित आरोपी निष्पन्न झाले असून, त्यामध्ये 22 जणांना अटक झाली आहे. तर 14 जण अद्यापही फरार आहेत.