भूम (प्रतिनिधी)- येथील रवींद्र हायस्कुलच्या 1988-89 च्या इयत्ता 10 वी च्या वर्गातील विद्यार्थ्यांचे स्नेह संमेलन मोठया उत्साहात व जुन्या आठवणी मध्ये रनमाण होत संपन्न झाले. 

रविवार दिनांक 27 रोजी संत श्री गजानन महाराज मंदिराच्या सभागृहात या स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सकाळी 10 ते 1 या दरम्यान स्वागत समारंभ,दुपारी 1 ते 2 भोजन, दुपारी 2 ते 4 एकमेकांचा परिचय व मनोरंजन, दुपारी 4 ते 5 आभार, फोटो ग्राफी, आभार व निरोप अशा भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी सकाळी 9 ते 10 या वेळेत शाळेस सर्व माजी विद्यार्थ्यांनी रवींद्र हायस्कुलला सदिच्छा भेट देऊन शाळेतच अल्पोपहार घेतला. दिवसभर सर्वानी एकमेकांशी दिलखुलास गप्पा मारल्या. यावेळी त्याकाळच्या मुलींचीही उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी गुरुजनांचा सन्मान करण्यात आला. उर्वरित कार्यक्रम गजानन महाराज मंदिरातील सभागृहात संपन्न झाला. यावेळी तत्कालीन शिक्षक सुभाष साठे,मोहन सलगर, श्रीधर वाघमारे, एन आर वारे, नामदेव शेंडगे, भाऊसाहेब जगदाळे, होनराव, कवाळे, उगलमुगले यांचा सन्मान करण्यात आला. 

या प्रसंगी भूम नगर पालिकेचे माजी गटनेते संजय गाढवे, डॉ विजयकुमार सूळ, सुनीलकुमार डुंगरवाल, बाळासाहेब निकाळजे, महादेव मनगिरे, जयेंद्र मैदर्गे, सोमनाथ पुरी, प्रदीप निकाळजे, नवनाथ सोनवणे, हरी कदम, राजाराम कदम, रवींद्र सम्राट, श्रीमंत छाया अंधारे, सुनीता कराळे, मनीषा मराठे,,अर्चना भिंगारे,बेबी विधाते यांच्यासह शिक्षक,विद्यार्थी मोठया संख्येने हजर होते.

 
Top