धाराशिव (प्रतिनिधी)-  धाराशिव तालुक्यातील तडवळा येथील इयत्ता पाचवी व आठवी साठी 9 फेब्रुवारी 2025 मध्ये झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल 10 जुलै 25 रोजी जाहीर झाला. यामध्ये जयहिंद विद्यालय कसबे तडवळे इयत्ता आठवीचे 6 विध्यार्थी जिल्हा परिषद आदर्श कन्या शाळेतील 22 मुली, जिल्हा परिषद आदर्श केंद्रीय प्राथमिक शाळेतील 9 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत. यामध्ये कन्या शाळेतील जान्हवी संतोष जाधव 278 गुण घेऊन राज्य गुणवत्ता यादीत आली आहे.

तडवळे गावचे एकूण 37 विद्यार्थी त्यामध्ये जिल्हा परिषद आदर्श कन्या प्राथमिक शाळेतील इयत्ता पाचवी वर्गातील तब्बल 22 विद्यार्थीनी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत. 


यामध्ये जान्हवी संतोष जाधव 278, तेजस्विनी किरण राऊत 268, सोनाली विनोद जाधव 260, गौरवी रामराजे शिनगारे 258, सई पवन वैद्य 258, आराध्या उमाकांत जमाले 254, मृत्युंजया महेश लांडगे 252, अमृता अमोल रोहिले 250, श्रावणी दयानंद राऊत 248, स्वराली भागवत शेळके 246, आश्लेषा किरण शिंदे 242, आरुषी अमोल सरवळे 242, अर्णवी जयसिंग थोरात 246, कार्तिकी शिवानंद पुजारी 234, श्रेया किशोर कावळे 232, संस्कृती पांडुरंग घोगरे 232, ईश्वरी नागनाथ डुमणे 226, अक्षरा धनंजय लोमटे 224, वैष्णवी विजय निंबाळकर 224, मानसी शिवाजी करंजकर 222, तहसीन सरफराज शेख 220, सृष्टी महादेव गरड 220 या विद्यार्थीनीगुण घेतले आहेत. 

आदर्श केंद्रीय प्राथमिक शाळा कसबे तडवळे येथील तन्मय दत्तात्रय नेमाने 250 गुण, अमेय दिलीप घोंगडे 244 गुण,सोहम ज्ञानेश्वर करंजकर 238 गुण,समर्थ सुखदेव घुले 238 गुण,सोहम नामदेव जमाले 236 गुण,अथर्व सुहास गरड 234 गुण,अतिफ मजहर शेख 226 गुण,प्रणित सुरज महाडिक 222 गुण,सार्थक बालाजी वाकळे 216 गुण हे विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत.

कसबे तडवळे येथील जयहिंद विद्यालयातील 6 विद्यार्थी  शिष्यवृत्तीधारक झाले आहेत. यामध्ये ऋतुजा ज्ञानेश्वर बारवकर 194 गुण, समर्थ सोमनाथ शिंदे 192 गुण ,अक्षरा लहू शिंदे 190गुण ,सायली मच्छिंद्र डोलारे 176 गुण,सोनाली दत्ता पैकेकर 176,वैष्णवी विशाल गायकवाड 152 गुण घेऊन शिष्यवृत्तीधारक झाले आहेत. 


यशस्वी विद्यार्थ्यांचा तेरणानगर बीटच्या विस्ताराधिकारी किशोरी जोशी, केंद्रप्रमुख जगदिश जाकते यांनी सत्कार केला. कन्या शाळेतील मुलींना मुख्याध्यापक रहिमान सय्यद,जगन्नाथ धायगुडे, शहाजी पुरी, संजय देशटवाड, गणपती यावलकर, देवेद्र घायतिडक, राणी अंधारे, अनिता देशमुख, शीलरक्षा शिंगाडे यांचे मार्गदर्शन लाभले. तर केंद्रीय शाळेतील मुलांना मुख्याध्यापक केशव पवार,बाळासाहेब जमाले,अंबिका कोळी,दतात्रय मगर,अजय जानराव, मोहम्मद नदाफ व रामकृष्ण ढवळे यांचे मार्गदर्शन लाभले.जयहिंद विद्यालयातील विद्यार्थ्यांना प्राचार्य एस.एस.पाटील, जयसिंग बोराडे ,संदीप पालके, पांडुरंग ठाकरे, राहूल कोकणी ,आशाबाई कोरडे, प्रतिभा क्षिरसागर यांचे मार्गदर्शन लाभले.

तडवळ्याच्या या शिष्यवृत्ती पॅटर्न बद्दल धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष, शिक्षणाधिकारी नागेश मापारी, गटशिक्षणाधिकारी असरार सय्यद,विस्ताराधिकारी किशोरी जोशी, केंद्रप्रमुख जगदीश जाकते, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमोल पवार, सोमनाथ भोसले यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन केले आहे.

 
Top