भूम (प्रातिनिधी)- हरित धाराशिव अभियानांतर्गत भूम तालुक्यात विविध गावांमध्ये शासनाच्या सर्व विभागांच्या वतीने 2 लाख 56 हजार वृक्ष लागवड करण्यात आली.
भूम नगर परिषद च्या वतीने श्री क्षेत्र आलमप्रभू देवस्थान येथे नगरपरिषदच्या वतीने दहा हजार वृक्षांची लागवड करण्यात आली.महसूल विभाग, पंचायत समिती,व कृषी कार्यालयाच्या वतीने 16 गावांमध्ये प्रत्येक गावामध्ये तीन हजार वृक्ष असे मिळून 48 हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. भूम वन विभागाच्या वतीने तालुक्यातील विविध गावांमध्ये 60 हजार वक्षांची लागवड करण्यात आली. सामाजिक दूरशेत्र वनीकरण विभागाच्या वतीने तालुक्यातील विविध गावांमध्ये व वन विभागाच्या क्षेत्रामध्ये 1लाख 38 हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. या धाराशिव हरित अभियानांतर्गत ग्रामपंचायत अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी, तालुक्यातील सर्व शाळेचे मुख्याध्यापक,महाविद्यालयाचे प्राचार्य, सेवाभावी संस्था, माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी, पक्षप्रेमी, भुम नगरपरिषदेचे कर्मचारी, तालुक्यातील सर्व प्रशालेचे शिक्षक त्यांच्यासह ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद वृक्ष लागवडीसाठी दिसून आला. भूमसाठी नोडल अधिकारी म्हणून मिरगणे यांनी काम पाहिले. तसेच तहसीलदार जयवंत पाटील यांनी 16 गावातील वृक्ष लागवड ठिकाणी भेट देऊन वृक्ष लागवडीची पाणी केली.