उमरगा (प्रतिनिधी)- हरीत धाराशिव अंतर्गत तालुक्यात एका दिवसात विक्रमी 1 लाख 57 हजार 800 रोपांची लागवड करण्यात आली. यामध्ये उमरगा नगरपालिकेकडून शहरात दिड एकरात 19 हजार 800 रोपांची तर मुरुम नगरपालिकेच्या वतीने शहरात 30 गुंठे क्षेत्रावर 9 हजार रोपांची तसेच 27 गावातील 11 एकर क्षेत्रावर श्रमदानातून 1 लाख 29 हजार वृक्षलागवड करण्यात आली आहे.
राज्यात ‘हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र' या अभियानांतर्गत 2025 मध्ये वृक्ष लागवड मोहीम लोक चळवळ म्हणून राबविण्यात येत आहे. यामध्ये उमरगा शहरात आमदार प्रविण स्वामी व मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर यांच्या हस्ते शहरात दिड एकरात 19 हजार 800 वृक्षलागवड करण्यात आली. मुरुम नगरपालिकेच्या वतीने शहरात 30 गुंठे क्षेत्रावर 9 हजार रोपांची लागवड करण्यात आली. यावेळी हरित अभियान नोडल अधिकारी सौ. ज्योती चव्हाण, मुख्याधिकारी सचिन भुजबळ, प्रतिभा निकेतनचे उपमुख्याध्यापक उल्हास घुरघरे, बालाजी बिदे, भाजपचे मुरुम मंडळ अध्यक्ष गणेश अंबर, रफिक तांबोळी, गौस शेख, सचिन पाटील, योगेश राठोड, राजू मुल्ला, सुजित शेळके यांच्या उपस्थितीत. तर बेळंब येथे भाजपाचे युवा नेते शरण बसवराज पाटील व तहसीलदार गोविंद येरमे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच तालुक्यातील तुगाव 3 हजार, कोराळ 3 हजार, महालिंगरायवाडी 3 हजार, व्हंताळ 3 हजार, बेळंब 12 हजार, आलुर 3 हजार, काळालिंबाळा 3 हजार, दाळींब 6 हजार, नाईचाकुर 3 हजार, पेठसांगवी 3 हजार, औराद 12 हजार, गुंजोटी 12 हजार, कदेर 6 हजार, कसगी 6 हजार, कंटेकुर 3 हजार, मुरळी 3 हजार, भुसणी 3 हजार, पळसगाव 3 हजार, दाबका 6 हजार, तुरोरी 3 हजार, कराळी 12 हजार, हंद्राळ 3 हजार, तलमोड 3 हजार, मुळज 3 हजार, आष्टा ज. 3 हजार, मळगी 3 हजार, चिंचोली (ज.) 3 हजार अशा एकुण 27 गावात शाळा, कॉलेज, बचतगट, अंगणवाडी व आशा कार्यकर्ती यांचे श्रमदानातून 1 लाख 29 हजार रोपांची लागवड करण्यात आली आहे. तालुक्यात एका दिवसात विक्रमी 1 लाख 57 हजार 800 रोपांची लागवड करण्यात आली आहे. प्रत्येक रोपाला क्यू आर कोड बसवून, रोपांचे मशागत, संगोपन करण्याची जबाबदारी नगरपालिका व ग्रामपंचायतला त्यांचे निधीतून करावी लागणार आहे.