धाराशिव (प्रतिनिधी)- प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली मोझरीच्या पवित्र मातीवर सुरू झालेलं अन्नत्याग आंदोलन अखेर यशस्वी ठरले. दिव्यांगांच्या न्यायहक्कासाठी सात दिवसांचा अन्नत्याग, हजारो किमीची पायी यात्रा आणि राज्यभरातील कार्यकर्त्यांचा संघर्ष याला मिळालेलं हे फळ  दिव्यांगांचे मासिक मानधन आता 1500 रुपयांवरून वाढवून 2500 रुपये करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

हा निर्णय केवळ आर्थिक मदतीपुरता मर्यादित नसून, तो दिव्यांगांच्या आत्मसन्मानाचा आणि त्यांच्या संघर्षाच्या यशाचा विजय आहे. राज्यातील हजारो दिव्यांग कुटुंबांना या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे.


अर्धवट यश  संघर्ष अद्याप सुरूच

मात्र, प्रहार संघटनेचे म्हणणे आहे की हा निर्णय पुरेसा नाही. दिव्यांगांचे खरे जीवनमान उंचावण्यासाठी किमान 6000 रुपये मासिक मानधन आवश्यक आहे. औषधे, प्रवास, शिक्षण, निवास व दैनंदिन खर्च यांचा विचार करता सध्याचे 2500 रुपये अपुरे आहेत, असे आंदोलनकर्त्यांचे मत आहे. राज्य सरकारचा निर्णय स्वागतार्ह असला तरी केंद्र सरकारनेही मानधन वाढवावे, यासाठी संघर्ष सुरूच ठेवण्यात येणार असल्याचे  बच्चूभाऊ कडूंनी जाहीर केले आहे.


धाराशिव जिल्ह्यातून आंदोलनाला मोठा पाठिंबा

या लढ्याच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष मयुर काकडे यांच्या नेतृत्वाखाली प्रहार दिव्यांग संघटनेतर्फे टेंबा आंदोलन, अन्नत्याग आंदोलन तसेच विविध आंदोलनात्मक उपक्रम राबवण्यात आले. बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व आंदोलनांना जिल्ह्यातून मोठा पाठिंबा लाभला. जिल्हाध्यक्ष मयुर काकडे यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात प्रहार संघटनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यांनी दिव्यांगांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष केला.


सरकारचे आभार, पण संघर्ष अजून संपलेला नाही

आज सरकारचा निर्णय स्वागतार्ह वाटत असला, तरी भविष्यात या विषयाकडे दुर्लक्ष झाल्यास पुन्हा नव्याने संघर्ष उभारावा लागेल, अशी स्पष्ट भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली. दिव्यांगांच्या सन्मानासाठीचा हा लढा एका टप्प्यावर यशस्वी ठरला असला, तरी अंतिम उद्दिष्ट अजून गाठायचं बाकी आहे  हा विश्वास प्रहारच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यातून जिल्हाध्यक्ष मयुर काकडे यांच्या नेतृत्त्वाखाली टेंबा आंदोलन, अन्नत्याग आंदोलन तसेच अनेक आंदोलनाच्या माध्यमातून प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने संघर्ष करण्यात आला हा संघर्ष बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष मयुर काकडे यांच्यासह बाळासाहेब कसबे जमीर शेख बाळासाहेब पाटील महेश माळी, शिवाजी चव्हाण, महादेव चोपदार, चित्रा शिंदे, गोकर्ण कोळगे, इसाक शेख, तानाजी मगर, दत्ता पवार, चव्हाण विठ्ठल, धोंडीराम राठोड दत्ता कोळगे उत्तम शिंदे दिनेश पोद्दार सुनील मगर आप्पा उपरे अभिजीत साळुंखे कालू जाधव मास्ती वाघमारे कैलास यादव गणेश शिंदे नारायण साखरे रमेश सावंत नितीन सगरे पैगंबर मुलानी शिवाजी पोतदार सचिन डोंगरे शिवाजी चव्हाण रामदास मते हरिदास कुंभार सचिन शिंदे शशिकांत गायकवाड दशरथ भाकरे आत्माराम बनसोडे अनिल महाबोले दिगंबर गाढवे बजरंग गव्हाळे नितीन मुळे नवनाथ कचार आकाश गलांडे राजेंद्र देशमुख नागराज मसरे रामेश्वर मदने नरहरी ढेकणे गौतम दुधे विकास शिरसागर तुकाराम कदम नारायण लोंढे हेमंत उंदरे अभिजीत साळुंखे मलताबाई कोळगे राणी मुसळे गणेश पांढरे इंद्रजीत मिसळ जमीर शेख नागनाथ वाघमारे संतोष माळी रूपाली शिरसागर सूर्यकांत इंगळे रवी शित्रे प्रशांत भांजे तसेच जिह्यातील पदधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 
Top