धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशनच्या अधिपत्याखाली धाराशिव जिल्हा स्पोर्ट्स योगासन असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत जिल्हाभरातून सहभागी योगपटूंनी आपली कसब दाखवत सादर केलेल्या योगासनांनी उपस्तितांची मने जिंकली आहेत.
धाराशिव येथील तुळजाभवानी क्रीडा संकुलावर घेण्यात आलेल्या या स्पर्धेचे उदघाटन व बक्षीस वितरण जिल्हा योगासन संघटनेचे सचिव प्रवीण गडदे, कोषाध्यक्ष अभय वाघोलीकर, सहसचिव राजेश बिलकुले, इंदुमती जाधव, वंदना इंगळे, सीमा चौरे आदींच्या उपस्तिथीत करण्यात आले. स्पर्धेत डॉ रविजीत देडे, प्रणाली जगदाळे, विनिता जाधव, श्रेया गरड, तेजस अलसेट यांनी पंच म्हणून काम पहिले. या स्पर्धेतून सुवर्णपदक विजेते योगपटूची छत्रपती संभाजी नगर व संगमनेर येथे होत असलेल्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेसाठी निवड झाली असून ते राज्यस्तर स्पर्धेत जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
स्पर्धेचा अंतिम निकाल सुवर्णपदक विजेते योगपटू पुढील प्रमाणे, ट्रॅडिशनल योगासन प्रकारात ईश्वर भांगे, तेजश्री कोळी, श्रुती गरड, सिद्देश कात्रे, मयुरी पवार, आसिया पटेल, सतीश साबळे, डॉ परवीन मुल्ला, बालाजी खंडागळे, इंदुमती जाधव, रिदमिक पेयर प्रकारात ईश्वर भांगे व इशांत भांगे, सिद्धी जाधव व इशिका चव्हाण, आर्टिस्टिक वैयक्तिक प्रकारात सिद्धी चव्हाण, राजवीर पोतदार, रिदमिक पेअर प्रकारात प्रीती तरंगे व ईश्वरी सरक, श्रुती गरड व संस्कृती कुतवळ, सुपाइन इंडिविज्युअल प्रकारात राजवीर पोतदार, अंजली साळुंके, परमेश्वर चौरे, हॅन्ड बॅलन्स प्रकारात सिद्धी चव्हाण, ट्विस्टिंग बॉडी प्रकारात इशिका चव्हाण, जयराज देशमुख, फातिमा शेख, सतीश साबळे, हॅन्ड बॅलन्स प्रकारात सिद्धी चव्हाण, बॅक बेंडिंग प्रकारात सई नलावडे, संस्कृती कुतवळ, लेग बॅलन्स प्रकारात वैभव खंडागळे, ज्ञानेश्वरी कवडे, सीमा चौरे, फॉरवर्ड बेंडिंग प्रकारात इशांत भांगे, सिद्धी जाधव, समृद्धी माळी, मयुरी पवार, सीमा चौरे.