धाराशिव (प्रतिनिधी)- अनसुर्डा (ता. जि. धाराशिव) येथील श्री संत सद्गुरु रावसाहेब बाबा पाटील महाराज अनसुर्डेकर यांच्या 19व्या पुण्यतिथी निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचे शुभारंभाचे औचित्य 21 जुलै 2025 रोजी संपन्न झाले. हा पवित्र सप्ताह 28 जुलै 2025 पर्यंत चालणार असून, त्यामध्ये विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या सप्ताहाच्या उद्घाटन प्रसंगी धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष, तसेच कोषागार अधिकारी अर्चना नरवडे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे विधिवत उद्घाटन झाले.
कार्यक्रमाचे मार्गदर्शन श्री पूज्य गुरुवर्य काकासाहेब पाटील महाराज अनसुर्डेकर यांनी केले. सप्ताहभर अनेक नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन, प्रवचन, भजन, आणि हरिपाठ इत्यादी आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या पवित्र सप्ताहाचा सर्व भाविक भक्तांनी श्रवणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री संत सद्गुरु रावसाहेब बाबा पाटील महाराज बहुउद्देशीय आध्यात्मिक प्रतिष्ठान, अनसुर्डा यांच्यातर्फे करण्यात आले आहे.