धाराशिव (प्रतिनिधी)- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या धाराशिव जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांची कार्यकारिणी जाहीर झाली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून यामध्ये नूतन जिल्हा सचिवपदी प्रवीण कोकाटे व युवा सेना जिल्हाप्रमुखपदी रवि वाघमारे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचा शिवसैनिकांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

नूतन कार्यकारिणीमध्ये कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे माजी शहरप्रमुख प्रवीण कोकाटे यांची जिल्हा सचिवपदी तर युवा सेनेचे शहरप्रमुख रवि वाघमारे यांची युवासेनेच्या जिल्हाप्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. धाराशिव, तुळजापूर, उमरगा लोहारा हे त्यांचे कार्यक्षेत्र राहणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत मोठे फेरबदल करण्यात आलेले आहेत. यामुळे त्यांची जबाबदारी वाढली आहे. धाराशिव शहरातील प्रवीण कोकाटे यांच्या संपर्क कार्यालयात बुधवारी झालेल्या या सत्कार सोहळ्यात दोन्ही नूतन पदाधिकार्‍यांचा पुष्पहार, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी हनुमंत देवकते, विकास वाघमारे, कुमार राजेनिंबाळकर, संजय खळदकर, राजेंद्र इंगळे, प्रविण नायकल, तेजस देवकते आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

 
Top