धाराशिव (प्रतिनिधी)- येथील श्रीपतराव भोसले हायस्कूलच्या मैदानावर विविध उपक्रमाने जागतिक ऑलिम्पिक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
निमित्त होते जागतिक ऑलिम्पिक दिनाचे. हा दिन सालाबादाप्रमाणे 23 जून रोजी जगभर साजरा केला जातो. या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन, महाराष्ट्र खो -खो असोसिएशन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय धाराशिव, जिल्हातील सर्व मान्यताप्राप्त एकविध खेळांच्या संघटना व श्रीपतराव भोसले हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक ऑलिम्पिक दिनाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य नंदकुमार नन्नवरे तर आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रथम मान्यवरांच्या हस्ते दीपप्रजल्वन करण्यात आले. त्यानंतर अर्जुन पुरस्कार प्राप्त विजेती सारिका काळे, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त विजेते शाहूराज खोगरे, प्रवीण बागल, राजाभाऊ दहिहंडे, रोहिणी सातपुते -आवारे, गौरी शिंदे तसेच जागतिक खो-खो कप विजयी खेळाडू अश्विनी शिंदे, जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे, तालुका क्रीडा अधिकारी बी. के. नाईकवाडी, क्रीडा अधिकारी अक्षय बिराजदार, क्रीडा मार्गदर्शक डिंपल ठाकरे, शुभांगी रोकडे, विश्वास खंदारे, राष्ट्रीय खेळाडू तन्वी भोसले, सुहानी धोत्रे, संपदा मोटे यांचा सत्कार या निमित्ताने करण्यात आला.
आपल्या प्रास्ताविकात शिवछत्रपती पुरस्कार विजेते शाहुराज खोगरे यांनी ऑलिम्पिकचा इतिहास ते आज पर्यंतचा प्रवास मुलांसमोर मांडला. शेवटी समारोपीय अध्यक्षीय भाषणात प्राचार्यांनी ऑलिम्पिक सह अनेक ऐतिहासिक घडामोडीचा आढावा घेऊन खेळातून शारीरिक व मानसिक आरोग्य संतुलित राहते, हा विचार त्यांनी या निमित्ताने दिला.
यावेळी उपप्राचार्य संतोष घार्गे, उपमुख्याध्यापक प्रमोद कदम, पर्यवेक्षक यशवंत इंगळे, सुनील कोरडे, बी. बी. गुंड, तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. धाराशिव जिल्हा तायकाँदो अंतर्गत केशवराज तायक्वॉदो अकॅडमीच्या वतीने तायव्वाँदो प्रात्यक्षिके मुलांनी मुख्य प्रशिक्षक राजेश महाजन, राम दराडे माधव महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमा शेवटी करून दाखविले. सूत्रसंचालन संदीप जगताप यांनी केले.