भुम (प्रतिनिधी)-  शालेय शिक्षण विभाग धाराशिव व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमानाने जि प शाळा बराणपुर आंतरराष्ट्रीय दिन शिवसेना वैद्यकीय जिल्हाप्रमुख पांडुरंग धस यांच्या प्रमुख उपस्थित उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.

 यावेळी शाळेच्या प्रणांगणावर योग शिक्षक मुख्याध्यापक पठाण सर, मोठे सर, यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व या विषया संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. शारीरिक,मानसिक, आरोग्य, या विषयावर त्यांनी आपले विचार मांडले तसेच त्यांनी योग कार्यक्रमास विद्यार्थ्यांकडून व उपस्थिताकडून त्यांनी वेगवेगळ्या आसनांची प्रात्यक्षिके करून घेतली.

यावेळी जिल्हाप्रमुख पांडुरंग धस बोलताना योग शरीर, मन, चेतना आणि आत्मा यांना संतुलनात आणते.शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्यात योगाभ्यास फार महत्वाचा आहे. तणावमुक्त, आनंददायी जीवनाचे सूत्र अंगिकारण्याचा संकल्प योग दिनानिमित्त करुया असे मत व्यक्त केले.

 
Top