धाराशिव (प्रतिनिधी)-  वीरेंद्र मिश्र विशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजी नगर परिक्षेत्र यांनी धाराशिव पोलीस अधीक्षक कार्यालय येथे भेट देऊन जिल्ह्यातील कायदा व व्यवस्था आणि पोलिसी कामकाजाबाबत आढावा घेतला. 

मान्यवरांच्या हस्ते पोलीस दलातील पोलीस अधिकारी तथा पोलीस अंमलदार यांच्याकरिता उभारण्यात आलेल्या इमारती मधील सदनिकांचे वाटप करण्यात आले. उत्कृष्ट कामगिरी बद्दल आढावा मीटिंगच्या वेळी  स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, अमोल मोरे आणि इतर पोलीस अंमलदार यांचे प्रशस्ती पत्रक देऊन अभिनंदन करण्यात आले. तसेच परंडा पोलीस स्टेशन येथे कार्यरत पोलीस अंमलदार राहुल खताळ यांनी सी ई आय आर या पोर्टलचा वापर करून हरवलेले मोबाईल हस्तगत करण्यामध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बाबत त्यांची ही प्रशंसा करण्यात आली आणि त्यांनी हस्तगत केलेले मोबाईल मूळ मालकांना मा. विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र यांचे हस्ते हस्तांतरण करण्यात आले. तसेच आगामी काळातील सण उत्सवा दरम्यान पोलीस विभागाकडून करावयाच्या कर्तव्याबाबत यावेळी मार्गदर्शन केले. सदर मिटींगला माननीय पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती शपकत आमना आणि धाराशिव पोलीस घटकातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी आणि सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.

 
Top