धाराशिव (प्रतिनिधी)- सोलापूर व धाराशिव परिसरातील विद्यार्थ्यांना संरक्षण क्षेत्रातील करिअर संधी, शिस्त, राष्ट्रसेवा आणि नेतृत्वगुण याबाबत जागरूक करण्यासाठी सातारा सैनिक स्कूल माजी विद्यार्थी संघटनेतर्फे सोलापूर शहरातील हुतात्मा स्मृती मंदिर येथे शनिवार दि. 28 जून रोजी सायंकाळी 6 ते 8.30 या वेळेत सैनिक शौर्याचा गौरव हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.  विद्यार्थी, पालक, शिक्षक व नागरीकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे  आवाहन आयोजकांनी केले आहे.

भारताच्या संरक्षण व्यवस्थेतील एक सशक्त पाया असलेली संस्था म्हणजे सैनिक स्कूल सातारा ही भारतातील पहिली सैनिक शाळा आहे. 1961 मध्ये स्थापन झालेल्या या गेली सहा दशके राष्ट्रसेवेसाठी झपाटून कार्य करणारे विद्यार्थी घडवले आहेत. आजपर्यंत 3000 पेक्षा अधिक विद्यार्थी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) व इतर संरक्षण सेवांमध्ये दाखल झालेले आहेत. या गौरवशाली स्थापनेच्या दिनानिमित्त सैनिक स्कूल सातारा माजी विद्यार्थी संघटना धाराशिव व सोलापूर चॅप्टर यांच्यातर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमात खालील प्रमुख वक्ते सातारा सैनिक स्कूलचे माजी विद्यार्थी सेवानिवृत्त एअर मार्शल अरुण पुरूषोत्तम गरुड हे 'सैनिकी सेवा  एक गौरवशाली प्रवास आणि संधी' या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तर सेवानिवृत्त ब्रिगेडियर अरविंद कुंडलकर हे 'लष्करी लढाऊ नेतृत्वाच्या धड्यांची नागरी जीवनात प्रासंगिकता',  सेवानिवृत्त ले. कर्नल रंजीतसिंह नलावडे हे

'भारतीय सेनेतील तांत्रिक सेवांमधील करिअर संधी' या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे. तरी सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक व नागरीकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी  नितीन बागल 9850010200 (धाराशिव) आणि गंगाधर थळंगे 9601864290 (सोलापूर) यांच्याशी संपर्क साधावा असेही आयोजकांनी कळविले आहे.

 
Top