तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथे उमेद चे प्रभाग समन्वयक राम अंकुलगे यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी महिलांची बैठक घेऊन कृषी विभागांतर्गत उमेद गटातील 40 शेतकरी महिलांना मूग पिशविचे मोफत वाटप करण्यात आले.
या वेळी कृषी सहाय्यक राम शिंदे यांनी कृषी विभागाच्या वेगवेगळ्या शासकीय योजनांची माहिती देऊन अर्ज करण्यास सांगितले. ऑफलाइन व ऑनलाईन पद्धतीने कोण कोणत्या योजनेचे अर्ज केले जाऊ शकतात याविषयी मार्गदर्शन केले तसेच कृषी व्यवस्थापक रोहिणी सुरवसे यांनी शेतकरी महिलांचा गट करून तो आत्मा लिंकेज करणे याविषयी मार्गदर्शन केले तसेच पोषण बाग याविषयी माहिती सांगून पोषण बागेचे महत्त्व पटवून दिले.यावेळी उपस्थित प्रभाग संघ व्यवस्थापक सविता टकले, कृषी सखी संगीता लंगाळे समुदाय संसाधन व्यक्ती पूजा चव्हाण ,ज्योती नाईकवाडी , वैशाली देवकते यासह उमेद गटातील शेतकरी महिला उपस्थित होत्या.