तुळजापूर (प्रतिनिधी)-  श्री तुळजाभवानी सैनिक शाळेत एका विद्यार्थ्याला मारहाण प्रकरणाची तातडीने स्वतंत्र चौकशी समिती नेमून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे तुळजापूर तालुकाप्रमुख अमोल शिवाजीराव जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले, या शाळेतील इयत्ता आठवीच्या एका विद्यार्थ्याला शिक्षकाने मारहाण केल्याची धक्कादायक घटनाही उघडकीस आली आहे. तरी या प्रकरणांची सखोल आणि पारदर्शक चौकशी करण्यासाठी स्वतंत्र समितीची स्थापना करावी.चौकशीत दोषी आढळणाऱ्या व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.हे निवेदन तालुका प्रमुख अमोल जाधव, रमेश कदम, प्रशांत मस्के, संजय लोंढे, भुजंग मुकेरकर, संजय पेंदे यांनी दिले.

 
Top