धाराशिव (प्रतिनिधी)- दरोडो टाकण्याच्या तयारी असणाऱ्या तीन आरोपींना देशी पिस्टलसह 5 लाख 5 हजार 800 रूपये किंमतीच्या मुद्देमालासह पकडले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्ह्यातील मालाविषयक गुन्ह्यातील आरोपीची माहिती काढुन चोरीचे गुन्हे उघडकीस आणणे बाबत पोलीस पथक पेट्रोलिंग करत असताना दि. 17.06.2025 रोजी रात्री तेरणा कॉलेज येथे आले. पथकास गोपनिय माहिती मिळाली की, धाराशिव विमानतळ कडे जाणारे रोडचे बाजूला चार ते पाच इसम एक चार चाकी कार व तीन मोटरसायकल सह अंधारामध्ये कोठेतरी दरोडा टाकण्याचे तयारीत संशईत रित्या थांबले आहेत.
अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पथकाने लागलीच माहिती मिळालेल्या ठिकाणी जावून थोड्या अंतरावर शासकीय वाहन थांबवून पायी चालत जात असताना तेथे थांबलेल्या इसमा पैकी दोन इसमांनी पथकातील कर्मचारी यांना पाहताच मोटरसायकलवर बसून पळून गेले. तेथे खाली बसलेले इतर साथीदार पळून जाण्याचे तयारीत असताना पथकाने त्यांना ताब्यात घेवून त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव धुपकिरण उर्फ अनिलशेट रामलगन चौधरी, वय 47 वर्षे, रा.अरिवला (फुलपुर) ता. भानपुर जि. बस्ती राज्य उत्तरप्रदेश, निलेश उर्फ कांचन संभाजी चव्हाण, वय 32 वर्षे रा. काकानगर ता. जि. धाराशिव, मुकेश शाम शिंदे, वय 24 वर्षे, रा. शिंगोली ता. जि. धाराशिव असे सागिंतले. पथकाने नमुद तीन आरोपीच्या ताब्यातून एक लोखंडी धातुचे गावठी बनावटीचे पिस्टल अंदाजे 75 हजार रूपये किंमतीचे, तिन जिवंत काडतुसे अंदाजे 600 रूपये, एक लोखंडी कोयता 200 रूपये, एक हयुंडाई कंपनीची संट्रो कार अंदाजे 2 लाख 30 हजार रूपये व एक बुलेट मोटरसायकल अंदाजे 1 लाख 55 हजार रूपये व होंडा ॲक्टीवा स्कुटी अंदाजे 45 हजार रूपये असा एकुण 5 लाख 05 हजार 800 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन पोलीस ठाणे धाराशिव ग्रामीण येथे नमुद आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करुन नमुद 3 आरोपीस मालासह धाराशिव ग्रामीण पोलीसांच्या ताब्यात दिले.
सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक रितु खोखर व शफकत आमना यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, सचिन खटके, पोहेकॉ विनोद जानराव, समाधान वाघमारे, नितीन जाधवर, पोलीस नाईक बबन जाधवर, चालक पोहेकॉ महेबुब अरब, पोकॉ विनायक दहीहांडे, पोकॉ प्रकाश बोईनवाड यांच्या पथकाने केली आहे.