धाराशिव (प्रतिनिधी)-डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर कार्यक्षेत्रातील चार जिल्ह्यात असलेल्या महाविद्यालयात तसंच धाराशिव येथील विद्यापीठ उप परिसर या ठिकाणी असलेल्या विविध विभागात प्रवेशासाठी आता पदवीच्या गुणवत्तेनुसार प्रवेश मिळणार आहे ,प्रवेशासाठी 'सीईटी' होणार नाही.

यासाठी 5 जून ते 30 जून दरम्यान ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे.

यासाठी विद्यार्थ्यांना ई-समर्थ पोर्टलद्वारे प्रवेशासाठी नोंदणी करता येणार आहे. खुल्या प्रवर्गासाठी नोंदणी शुल्क 200/- राखीव प्रवर्गासाठी 100/-रूपये नोंदणी शुल्क असणार आहे. त्यानंतर 5 जुलैपर्यत संबंधित विभागांत विद्यार्थ्यांनी कागदपत्रे सादर करावी,14 जुलै रोजी कागदपत्रांची छाननी पुर्ण होईल,17जुले रोजी सामान्य गुणवत्ता यादी जाहीर,आक्षेपासाठी दोन दिवसांची मुदत, 21 जुलै रोजी सुधारित गुणवत्ता यादी जाहीर होईल. 22 जुलै रोजी निवड यादी जाहीर.

विद्यार्थ्यांना 23 ते 25 जुलै दरम्यान प्रवेश निश्चित करावे लागणार.31 जुलै रोजी स्पॉट ॲडमिशनघेता येणार आहे.26 जुलै रोजी द्वितीय गुणवत्ता यादी जाहिर होईल. 28 व 30 जुलै रोजी द्वितीय प्रवेश फेरी होणार आहे. तर 31 जुलै रोजी विद्यापीठातील विभागात स्पॉट ॲडमिशन होणार आहे. विद्यापीठ परिसरात गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच वस्तीगृहाची सुविधा, विविध शिष्यवृत्ती, व इतर अनेक सुविधा आपणास उपलब्ध आहेत आपण सर्वांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी विद्यापीठाची निवड करावी असे आवाहन राज्यपाल नियुक्त अधिसभा सदस्य देविदास पाठक यांनी केले आहे.


 
Top