पुणे (प्रतिनिधी) मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री धरम वीर मीना, प्रधान विभाग प्रमुख तसेच पुणे व सोलापूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांच्या सोबत दिनांक 23.06.2025 रोजी पुणे येथील विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयातील हॉलमध्ये पुणे व सोलापूर विभागातील माननीय खासदारांसोबत बैठक घेण्यात आली.

या बैठकीस माननीय खासदार सौ. सुप्रिया सुळे (बारामती), श्री श्रीरंग अप्पा बारणे (मावळ), श्री ओमप्रकाश भूपालसिंगराजे निंबाळकर (धाराशिव), श्री धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील (माढा), डॉ. अमोल रामसिंग कोल्हे (शिरूर), श्री भाऊसाहेब राजाराम वाकचौरे (शिर्डी), श्री निलेश ज्ञानदेव लंके (अहमदनगर), श्री विशालदादा प्रकाशबापू पाटील (सांगली), सौ. रजनी अशोकराव पाटील (बीड), श्री नितीन लक्ष्मणराव जाधव पाटील (सातारा), श्री शिवाजी बंडप्पा काळगे (लातूर), सौ. माया नारोलिया (होशंगाबाद) आणि सौ. मेधा कुलकर्णी (राज्यसभा पुणे) यांनी उपस्थिती दर्शविली.

सर्वानुमते  माननीय खासदार सौ. सुप्रिया सुळे यांची या समितीच्या अध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली.

या आधी महाव्यवस्थापक श्री धरम वीर मीना यांनी सर्व माननीय खासदारांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले. आपल्या स्वागतपर भाषणात श्री धरम वीर मीना यांनी प्रकल्पांच्या यशस्वी पूर्णतेसाठी मिळालेल्या सहकार्याबद्दल व प्रेरणेसाठी माननीय खासदारांचे आभार मानले व त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवाशांना आणखी चांगल्या सुविधा देण्याचा विश्वास व्यक्त केला. तसेच त्यांनी मध्य रेल्वेच्या यशस्वी कामगिरीबद्दल सांगितले पुरस्कारांच्या स्वरूपात मिळालेल्या प्रतिष्ठित जी. बी. पंत शिल्ड आणि पहिल्या आणि दुसऱ्या इनोव्हेशन पुरस्कारांवरही प्रकाश टाकला.

या बैठकीचे संचालन मध्य रेल्वेचे उपमहाव्यवस्थापक श्री के. के. मिश्रा यांनी केले. पुणे विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री राजेश कुमार वर्मा व सोलापूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री सुजीत मिश्रा यांनी आपल्या-आपल्या विभागातील यशस्वी प्रगती व उपक्रमांबाबत सविस्तर सादरीकरण केले.

माननीय खासदारांनी त्यांच्या मतदारसंघातील विविध मागण्या मांडल्या तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांसाठी व रेल्वेने सुरू केलेल्या अमृत भारत स्टेशन योजना, वंदे भारत एक्सप्रेस, अमृत भारत एक्सप्रेस व विशेष गाड्यांसाठी रेल्वेचे कौतुक केले. यावेळी उपस्थित माननीय खासदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देण्यात आली व प्रवासी सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी त्यांच्या सूचना अमलात आणण्याचे आश्वासन देण्यात आले.

 
Top