तुळजापूर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा तिर्थ खुर्द येथील मुख्याध्यापिका अंजली कावरे (क्षिरसागर) यांच्या सेवानिवृत्ती निमित्त सत्कार शिक्षण विस्तार अधिकारी रंजना मैंदर्गी, शोभा राऊत, केंद्रप्रमुख तानाजी महाजन ,सरपंच शैला मोरे, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष हणमंत जाधव यांच्या हस्ते सहपती सत्कार करण्यात आला.
यावेळी पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे,नितीन सूर्यवंशी,बाळासाहेब पाटील, ग्रामपंचायत सदस्य नाना पटाडे ,विनोद जाधव ,बालाजी डांगे,ज्योतीबा पौळ, अजय पवार,दत्तात्रय क्षिरसागर ,कांचन जाधव, पुनम पोतदार , शिक्षक प्रतिनिधी धनाजी मुळे, दिगंबर हुंडेकरी पवन सूर्यवंशी, सचिन राऊत, लक्ष्मण साखरे उपस्थित होते.
शिक्षण क्षेत्रातील पवित्र कार्याचा हा गौरव असल्याचे उद्गार रंजना मैंदर्गी यांनी काढले यावेळी शोभा राऊत, विशाल अंधारे, नीता लोखंडे, अनिता मोरे ,महेंद्र कावरे,दिपाली खंडागळे,सचिन राऊत,कु. आर्या जाधव, कु. अंजली जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक सहशिक्षक सोमनाथ केवटे यांनी केले सूत्रसंचालन रेखा गोरे यांनी केले. आभार संतोष माडजे यांनी मानले.यावेळी भुताळे राजेश्वरी यांचा प्र. मुख्याध्यापिका निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला कार्यक्रम यशस्वीतेसाठी अशोक खडके,राजकन्या कानडे,वैष्णवी पौळ, पुष्पा कदम, राजू मुळूक यांनी परिश्रम घेतले. यावेळी ग्रामस्थ विद्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.