भूम (प्रतिनिधी)- वाशी तालुक्यातील तांदुळवाडी येथील शेतकऱ्यांनी पवनचक्की विरोधात उभारलेल्या आंदोलनाचा अमर उपोषणाचा आज पाचवा दिवस असून आजच्या दिवशीही प्रशासनाकडून झालेली चर्चा वांजुटी झाली. यामध्ये आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उडी घेतली असून उद्या अकरा वाजेपर्यंत सदर आंदोलन न मिटल्यास शेतकरी संघटनेच्या पद्धतीने नव्याने आंदोलन उभारणार असल्याचे शेतकरी संघटनेचे तानाजी पाटील यांनी सांगितले. 

आज उपोषणाच्या पाचव्या दिवशी उपोषणार्थ बसलेल्या शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तानाजी पाटील हे वाशी येथे गेले असता त्यांनी यावेळी उपोषणार्थ शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्याबाबत सविस्तर चर्चा केली व यावेळी तहसीलदार प्रकाश मेत्रे यांची चर्चा करून हे आंदोलन तात्काळ मिटवून संबंधित शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली यावेळी  तहसीलदार प्रकाश मेहत्रे यांनी उद्या अकरा वाजेपर्यंत यावर तोडगा काढण्याची माहिती दिली परंतु 11 वाजेपर्यंत या आंदोलनावरती मार्ग न निघाल्यास अकराच्या नंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकरी स्टाईल आंदोलन करत आणि याची जिम्मेदारी प्रशासनाची राहील असा इशारा यावेळी तानाजी पाटील यांनी दिला उपोषणावर बसलेले शेतकऱ्यांपैकी आज सहा जणांची प्रकृती आणखी घालवल्याने त्यांना उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे दरम्यान शेतकरी चालू केलेल्या या आंदोलनास प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने आतापर्यंत भेट देऊन पवन चक्क्या धारक व प्रशासन यामध्ये साटेलोटे असल्याचे यावरून दिसून येते  उपोषणाच बसलेल्या शेतकऱ्याला आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे वाशी तालुकाध्यक्ष गजानन भारती व भूम तालुका अध्यक्ष तानाजी पाटील यांनी भेट देऊन संघटना तुमच्या सोबत असल्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली  यामध्ये उपोषणाच बसलेल्या शेतकऱ्यांचा बळी जातोय की काय अशी शंका व्यक्त होत आहे दरम्यान आज वाशी तहसील कार्यालयात तहसीलदार प्रकाश मेहत्रे यांनी उपोषणार्थ शेतकरी व संबंधित पवन चक्क्याचे अधिकारी यांची बैठक घेतली असता यामध्ये शेतकरी प्रति मीटर 22 हजार रुपये व प्रति टावर सतरा लाख रुपये या मागणी वरती शेतकरी ठाम असून ही मागणी संबंधित कंपनीस मान्य नाही  अशी एवढी चर्चा झाली यावेळी सांगण्यात आले दरम्यान मी वारंवार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून निश्चितपणे यामध्ये उद्या तोडगा निघेल अशी माहिती यावेळी तहसीलदार मैत्री यांनी दिली.

 
Top