धाराशिव (प्रतिनिधी)- स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त “मावळा प्रतिष्ठान“ धाराशिव यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. सदर रक्तदान शिबिरास उस्फुर्त असा प्रतिसाद मिळून तब्बल 243 रक्तदात्यांनी रक्तदान केले. त्याबद्दल रक्तदात्यांचे देखील मनस्वी आभार व्यक्त केले. सदर रक्तदात्यांना मावळा प्रतिष्ठान यांच्यावतीने स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी आवश्यक प्रश्नसंचांची पुस्तके देखील रक्तदात्यांना भेट देण्यात आली आहेत. सदर रक्तदान शिबिरास महिलांचा देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद होता. धाराशिव शहरात प्रथमच सर्वोत्कृष्ट व स्तुत्य असा समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात आला. त्याबद्दल मावळा प्रतिष्ठान व सदस्य मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन त्यांच्या या समाज उपयोगी कार्यासाठी मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर मावळा प्रतिष्ठानचे संस्थापक अक्षय खळदकर, दत्ता मोहिते व सर्व सदस्य तसेच नागरिक उपस्थित होते.

 
Top