तुळजापूर (प्रतिनिधी)- मंदिर संस्थान येथे पुजाऱ्यांचे नियमन देऊळ कवायत कायद्यानुसार केले जाते. पुजाऱ्यांवर कारवाई करताना देखील या कायदयातील तरतुदींनुसार कार्यवाही केली जाते. मंदिराचे कायदा व सुव्यवस्थेस अडथळा निर्माण होईल, शिस्तीस बाधा येईल, अशोभनीय वर्तन इत्यादि बाबींवर देऊळ कवायत कायद्यानुसार कारवाई करण्यात येते. मागील 6 महिन्यांत अनेक पुजाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली असून एकूण 12 पुजाऱ्यांवर मंदिर प्रवेश बंदीची कारवाई करण्यात आलेली आहे.
मंदिर प्रवेश बंदीची कारवाई करण्यात आलेल्या पूजाऱ्यांची नावे आणि कारवाईचा तपशील खालीलप्रमाणे-
ओंकार हेमंत इंगळे एक महिना बंदी, अभिजीत माधवराव कुतवळ एक महिना बंदी, श्रीधर विनायक क्षीरसागर 15 दिवस बंदी, अक्षय किशोर कदम 15 दिवस बंदी, महेश भारत रोचकरी 15 दिवस बंदी, अजय संजय शिंदे 15 दिवस बंदी, सुदर्शन यशवंत वाघमारे 6 महीने बंदी, रणजीत अविनाश साळूंके 2 महीने बंदी, अमित दत्तात्रय तेलंग-कदम एक महीना बंदी, नानासाहेब जगन्नाथ चोपदार एक महीना बंदी, तुषार विजयकुमार पेंदे 3 महीने बंदी, प्रदीप विलास मोटे 3 महीने बंदी.