परंडा (प्रतिनिधी) - भिमप्रतिष्ठान च्या वतीने सोमवार दि.12 मे 2025 रोजी वैशाखी पौर्णिमा विश्वाला शांततेची शिकवण देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या 2569 व्या जयंती निमित्ताने येथील मंडई (रेवणी ) भीम नगर येथे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

भीम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक रत्नकांत ( पापा )शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस शिवसेना युवा नेते आझीमभाई सौदागर.ज्येष्ठ समाजसेवक तानाजी शिंदे, प्रा.डॉ. शहाजी चंदनशिवे  तानाजी बनसोडे यांच्या हस्ते धूप दीप व पुष्प वाहून सर्व उपस्थित उपासक व उपासिका बालक बालिका यांनी अभिवादन केले. 

याप्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तानाजी शिंदे, फुले आंबेडकर विद्वत सभेचे राज्य समन्वयक डॉ. शहाजी चंदनशिवे वंचित बहुजन आघाडीचे  जिल्हा सदस्य तानाजी बनसोडे ,रणजित शिंदे ,युवा नेते सचिन चौतमहाल, तुकाराम चौतमहाल ,जयर्वधन शिंदे ,शिवाजी शिंदे ,माजी नगरसेवक संजय घाडगे   बालाजी ठोसर, भाग्यवंत शिंदे, शिवाजी बनसोडे अभिजीत शिंदे, प्रकाश शिंदे , विक्रम चौतमहाल , संदेश शिंदे, भीमा (बबलु ) शिंदे, प्रफुल्ल चौतमहाल, विक्रम चौतमहाल, यशपाल बनसोडे ,किरण सोनवणे  जय शिंदे, अक्षय चौतमहाल, मुन्ना बनसोडे ,राहुल बसवंत, भुषेंन बसवंत.अजय चौतमहाल, विलास बनसोडे नितीन बनसोडे, भुपेंद्र बनसोडे , यांच्यासह भिम नगर मधील अनेक बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते .याप्रसंगी सर्व उपस्थित त्यांना अल्पोपहार म्हणून सर्वांना प्रसाद म्हणून खाण्यास देण्यात आली.

 
Top