धाराशिव (प्रतिनिधी)- विश्वाला शांतीचा मार्ग सांगणारे तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त बौद्ध नगर येथे ज्ञानसूर्य बी. आर. आंबेडकर बहुउद्देशीय सामाजिक संस्था व बी. आर. आंबेडकर प्रतिष्ठान धाराशिवच्या वतीने महिलांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले व त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले. ज्ञानसूर्य बी आर आंबेडकर बहुउद्देशीय सामाजिक संस्था व बी. आर. आंबेडकर प्रतिष्ठान धाराशिवच्या वतीने अन्नदान व खीरदान करण्यात आले. यावेळी बौद्धनगर धाराशिव येथील सर्व नागरिक उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शक रावसाहेब शिंगाडे, शिवाजी जानराव, सतीश शिंदे, गौतम सोनवणे,हुंकार बनसोडे, हरिश्चंद्र कदम, सम्राट अशोक धम्मचक्र बहुउद्देशीय प्रतिष्ठान चे सचिव प्रशांत बनसोडे, रावसाहेब मस्के, किरण कांबळे, संतोष हुंडे, सुरेश वाघमारे संतोष वाघमारे, रोहित शिंगाडे, परमेश्वर माने, विकी नाईकवाडी, प्रमोद ढवळे, प्रतीक माळाळे,आनंद वाघमारे, धम्मपाल वाघमारे,मंगेश हुंडे, धीरज वाळवे, स्वराज शिंदे आदीसह बी. आर. आंबेडकर प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.