धाराशिव (प्रतिनिधी)- साहस, शौर्य,स्वाभिमान आणि पराक्रमाचे प्रतिक शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौकात पुतळ्याचे पुजन जेष्ठ नागरिक मच्छिंद्र पवार,विठ्ठल पवार,तेलु समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर,शिवसेनेचे माजी शहर प्रमुख प्रविण कोकाटे,नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण माने,समता परिषदेचे मराठवाडा सरचिटणीस आबासाहेब खोत यांच्या शुभहस्ते पुजन करण्यात आले.शिवप्रताप प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष दिपक पवार व खंबीर साथ अक्षय साळुंखे यांच्याकडून जयंती निमित्त गरजू समाज बांधव यांना किराणा,संसार उपयोगी वस्तू देऊन जयंती निमित्त वेगळा पायंडा पाडला.शासकिय रूग्नालयात फळे व खाऊ वाटप करण्यात आले.तसेच सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून मिरवणूकीचे आंबेडकर पुतळा,बार्शी नाका चौक आयोजन करण्यात आले होते.याजयंती उत्सव समितीत जयंती अध्यक्ष विकी पवार, मार्गदर्शक संजोग पवार,लक्ष्मण पवार,राज पवार,सागर साळुंखे,लखण पवार,विजय साळुंखेतेजेस साळुंखे,सुरेश साळुंखे,रवि पवार,विजय साळुंखे,आकाश पवार,आकाश चव्हाण,शिवराज चव्हाण,विजय पवार,सुमित पवार,नितिन पवार,बंडू माने यांच्या सह पदाधिकारी समाज बांधव संख्येने उपस्थित होते.