धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेत श्रीतपराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने लातूर विभागात आपल्या दैदिप्यमान यशाची परंपरा कायम राखली आहे. विद्यालयातील 12 वी बोर्ड परीक्षेसाठी सर्वाधिक विद्यार्थी संख्या असूनही उल्लेखनीय यश विद्यालयाने मिळविले आहे.
विज्ञान शाखेतून एकूण 767 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली होती. त्यापैकी 748 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यातील 31 विद्यार्थी हे विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेले आहेत. या शाखेचा सरासरी निकाल 97.52% एवढा आहे. विज्ञान शाखेमधून प्रथम क्रमांक शेख मिजबा दाऊद शेकड़ा 89.17 टक्के, व्दितीय कु.कुलकर्णी विनीता दत्तात्रय 88.17 टक्के, तसेच तृतीय क्रमाक बुर्ले अजिंक्य बिभीषण 86.83 टक्के प्राप्त केले. विद्यालयाच्या कला शाखेतुन 199 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी 159 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. त्यातील 6 विद्यार्थी हे विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेले आहेत. या शाखेचा सरासरी निकाल 79.89 टक्के एवढा आहे. कला शाखेमधुन प्रथम क्रमांक पटेल दिक्षा रामप्रसाद 85. 33 टक्के, व्दितीय सांगळे अंजली गोपीनाथ 82.33 टक्के, तृतीय भोसले श्रेया रविंद्र 80 टक्के आहे. तसेच वाणिज्य शाखेतून 104 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी 93 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यातील 9 विद्यार्थी हे विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. या शाखेचा सरासरी निकाल 89.42 टक्के एवढा आहे. वाणिज्य शाखेमधुन प्रथम क्रमांक डोंगरे आरती अरुण 92. 33 टक्के, व्दितीय क्रमांक थोरात क्रांती सुधाकर 91.17 टक्के, व तृतीय क्रमांक कसबे ऋतुजा अविनाश 89.33 टक्के आहेत.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष सुधीर पाटील यांनी अभिनंदन केले. ते म्हणाले, बोर्ड परीक्षेच्या यशासोबतच संस्थेने अजून एक उपक्रम सुरू केला आहे. धाराशिव पॅटर्न तयार करण्यासाठी एनईईटी (नीट), जेईई व सीईटी परीक्षांच्या तयारीसाठी आपल्या शहरात प्रथमच 'फिजिक्सवाला' चे ऑफलाईन क्लासेस सुरू करण्यात आलेले आहेत. याचा फायदा मेडिकल, इंजीनियरिंग प्रवेशासाठी निश्चितच होईल. तसेच एच. एस. सी. बोर्ड परीक्षेतील निकालाचा दबदबा श्रीपतराव भोसले उच्च माध्यमिक विद्यालयाने कायमच राखला आहे असेही ते म्हणाले. यावेळी सरचिटणीस प्रेमाताई सुधीर पाटील, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य पाटील, प्रशासकीय अधिकारी एस. एस. देशमुख, प्राचार्य एन. आर. नन्नवरे, उपप्राचार्य एस. के. घार्गे, पर्यवेक्षक एम.व्ही. शिंदे, फोटॉन बॅचचे प्रमुख ए. व्ही. भगत, फेनॉमेनाल बॅचचे प्रमुख जे. एस. पाटील तसेच सर्व प्राध्यापक, विषयप्रमुख, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी देखील सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.