भूम (प्रतिनिधी):-येथील जिल्हा परिषद हायस्कूलचा एसएससी परीक्षा मार्च २०२५चा निकाल सलग १० व्या वर्षी १००% टक्के लागलेला आहे .यावर्षी प्रशालेतून प्रथम क्रमांक मोनिका रवींद्र कुटे -88.48% द्वितीय क्रमांक पल्लवी बापुराव केसकर-85.20% तृतीय क्रमांक भक्ती धनंजय साठे-76.60% यांना पटकावला . या सर्व मुलींनी कोणत्याही शिकवणीशिवाय हे यश प्राप्त केले आहे .माजी मुख्याध्यापक संजीवन सातपुते यांच्या हस्ते सर्व गुणवंतांचा सत्कार शाल ,गुलाबपुष्प ,पेन देऊन करण्यात आला. यावेळी गुणवंतांनी आम्ही शाळेचे नाव भविष्यकाळात उज्वल करणार आहे अशी हमी दिली .
या कार्यक्रमाला सर्व गुणवंतांचे आई - वडिल, आजी- आजोबा तसेच मुख्याध्यापक तात्या कांबळे ,पवार के सी ,पाटील डी जी , पायघन यु पी , जोशी ए टी , गुंजाळ डी एस , श्रीमती विधाते व्ही आर , जाधवर एस एन .,साठे एच डी ,झरकर ए .के व विद्यार्थी उपस्थित होते .