धाराशिव (प्रतिनिधी)- अखिल भारतीय बालरोग संघटना धाराशिव, डिस्ट्रिक्ट अरली इंटरवेंशन सेंटर (DEIC), व बालरोग विभाग, शासकिय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शासकिय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव येथे जागतिक थॅलेसेमिया दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी डॉ. शैलेंद्र चव्हाण अधिष्ठाता, शासकिय वैद्यकीय महाविद्यालय व प्रमुख पाहुणे डॉ. धनंजय चाकुरकर जिल्हा शल्य चिकित्सक, धाराशिव हे उपस्थित होते. तसेच डॉ. तानाजी लाकाळ अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक तथा वैद्यकीय अधीक्षक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. दत्तात्रय खुणे यांनी केले. यावेळी उपस्थित थॅलेसेमिया या आजाराने बाधित झालेल्या रुग्णांना डॉ. पूजा देशमुख यांनी मार्गदर्शन केले. तर कार्यक्रमाचे आभार डॉ. संजय सोनटक्के यांनी मानले. यावेळी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी फुलारी, अखिल भारतीय बालरोग संघटनेचे अध्यक्ष डॉ. दत्तात्रय खुने, सचिव डॉ. नितीन भोसले, कोषाध्यक्ष डॉ. आमेर खान, सदस्य डॉ. मुकुंद माने, डॉ. सुधीर मुळे, मेट्रन गोरे मॅडम, सर्व बालरोग विभागातील अधिपरिचारिका, परिचारिका, कर्मचारी, विभागातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.