भूम (प्रतिनिधी)-  भूम तालुक्यातील गणेगाव येथील सहशिक्षक संतोष दादाराव तोडकरी यांना धाराशिव जिल्हा परिषदेच्या वतीने दिला जाणारा सण 2023-24 या शैक्षणिक वर्षातील जिल्हा शिक्षक पुरस्कार धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक, खासदार ओमराजे निंबाळकर ,जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,मुख्य कार्यकारी अधिकारी मैनक घोष, आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी, प्राथमिक शिक्षणाधिकारी अशोक पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुधा साळुंखे यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. 

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नरत असणारे संतोष तोडकरी यांचे कार्य प्रेरणादायी आहे. लोकवर्गणीतून शाळेत रंगरंगोटी, क्रीडा साहित्य, बाल उद्यान साहित्य,विविध भौतिक साधनांची पूर्तता करून शाळा नावा रूपास आणली आहे. विविध शैक्षणिक ॲप्सचा शालेय शिक्षणात खुबीने वापर करून शालेय शिक्षण आनंददायी व परिणामकारक केले आहे. 

 
Top