कळंब (प्रतिनिधी)- कळंब तालुक्यातील मोहा येथील डॉ सविता अजित मोहेकर यांनी अमेरिकेतील बोस्टन येथील तुफ्ट्स विद्यापीठातून रोबोटिक्स मध्ये  प्रो. मार्कस बी.नेमीट्स यांच्या मार्गदर्शनासाखाली एम्बेडेड फ्लुइडिक कंट्रोलसह 3D प्रिंटेड सॉफ्ट रोबोट्सची जलद डिझाइन आणि फॅब्रिकेशन स्ट्रॅटेजीज या विषयावर पी.एच.डी. पदवी प्राप्त करून एक मोठे शैक्षणिक

यश संपादन केले आहे. अमेरिकेत पदवी स्वीकारताना मार्गदर्शक प्राध्यापक, ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर, संचालिका प्रा. अंजलीताई मोहेकर, अजित मोहेकर, दिपक व श्वेता भातलवंडे परिवार यावेळी उपस्थित होता. त्यांनी रोबोटिक्समध्ये पी.एच.डी. पदवी मिळवल्याबदल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. डॉ. सविता अजित मोहेकर या ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळ्याचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या सूनबाई आहेत.


 
Top