धाराशिव (प्रतिनिधी)- कळंब तालुक्यातील इटकुर व वाशी तालुक्यातील तेरखेडा येथे नवीन उप डाक घर कार्यालयाचे उद्घाटन खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी धाराशिव कळंबचे आमदार कैलास पाटील उपस्थित होते. 

ईटकूर उप डाकघर कार्यालय 413625 या पिन कोड सह नवीन उपडाक घर कार्यालय सुरू करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे तेरखेडा परीसरातील गैरसोय दुर होऊन 413626 या पिन कोड सह नवीन उपडाक घर कार्यालय सुरू करण्यात आले आहे. धाराशिव जिल्ह्यातील लोकसंख्या व उपलब्ध कार्यालय या यांच्यामधील आढावा घेतला असता जवळपास दहा उपडाक घर कार्यालय व 150 पेक्षा जास्त डाकघर कार्यालयाचे प्रस्ताव मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठवले असून यापैकी 126 ठिकाणी नवीन कार्यालय मंजूर करण्यात येथील अशी माहिती यावेळी खासदार ओमराजे यांनी दिली. 

या कार्यक्रमाला सहायक डाक निदेशक छ. संभाजीनगर ए. के. शेख, डाक अधीक्षक,धाराशिव संजय आंबेकर, माजी सरपंच तेरखेडा दिलीप घोलप, प्रशांत चेडे, जिल्हाप्रमुख रणजीत पाटील, तालुकाप्रमुख तात्या गायकवाड,कांतीलाल बोराना,शंकर जाधव,उद्धव साळवी,रईस भाई मुजावर, विश्वजीत जाधव, प्रदिप फरताडे, प्रताप पाटील, आबा बावळे, संजय होळे उपस्थित होते. एस. जी. गायकवाड, श्रीकांत माने, बी. सी. माळी, व्ही. एन. पाटील, यशवंत वाघमारे, ए. के.शेख, कळंब तालुक्याचे पोस्टमास्तर कुंभार व इतर पोस्ट विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.



विभागीय डाकघर कार्यालय परत आणणार

धाराशिव येथे कार्यरत असलेले विभागीय कार्यालय लातूर येथे स्थानांतरित झाल्यानंतर धाराशिवसाठी पुर्वीचे स्वतंत्र विभागीय कार्यालय सुरू करण्यासाठी मंत्री महोदय यांना पत्र दिले आहे. पुर्वीचे विभागीय कार्यालयासाठीची प्रक्रिया सुरू असून ते लवकरच मंजूर होणार असल्याचे देखील माहिती देण्यात आली. 



जीर्ण इमारती पाडून नवीन इमारत उभारणार

धाराशिव जिल्ह्यातील पोस्ट खात्याच्या जुन्या इमारतीचे नवीन बांधकाम करण्याचे प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे निधी मंजूर साठी पाठवले होते. सदर प्रस्तावास मंजुरी देण्यात आली असून जिल्ह्यातील जीर्ण इमारतींचे ठिकाणी नवीन बांधकाम करण्यात येणार आहे. उस्मानाबाद शहरातील मुख्य पोस्ट ऑफिस जीर्ण झाले असून, त्यांचा वेळोवेळी पु. वि. लोकराज्य ने पाठपुरावा केला होता. 

 
Top